शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; अहमदनगर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 10:35 IST

घारगावात वायरमनची गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ माजली आहे.

घारगाव (जि. अहमदनगर)  : संगमनेर तालुक्यातील घारगाव महावितरणच्या एका वायरमनने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रदीप शांताराम कडाळे ( वय २५ , रा. कडाळेवस्ती , घारगाव, ता. संगमनेर ) असे या वायरमनचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडाळे हे गुरुवारी (दि. २३ ) नेहमीप्रमाणे घारगाव महावितरण येथे कार्यरत होते. अकलापुर रोड येथील एका कॉम्प्लेक्समध्ये ते राहण्यास होते. गुरुवारी रात्री साडे बारा वाजलेच्या दरम्यान कडाळे यांनी बेडरूमचा दरवाजा लावला ते दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या पत्नी पूजा यांनी कडाळे यांच्या मित्रांना फोनवरून कळविले. मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कडाळे यांच्या मित्रांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कडाळे यांनी बेडरूम मधील फॅन लटकवण्याच्या लोखंडी हुकाला कापडी बेडशीट बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये खबर देण्यात आली.         पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय विखे,पोलीस नाईक राजेंद्र लांघे,चालक नामदेव बिरे यांनी जाऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह खाली घेण्यात आला. शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात कडाळे यांंचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. वायरमन कडाळे हे या ठिकाणी  पत्नीसोबत दोघेच राहत होते. कडाळे यांनी आत्महत्या का केली, याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही. गणेश विठ्ठल लेंडे (वय-२५, रा. खंदरमाळ) यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करीत आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरण