शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

‘त्या’ वक्तव्यावर खासदार सुजय विखे यांनी माफी मागावी : दीपाली सय्यद यांचा संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 18:27 IST

खासदार सुजय विखे यांनी साकाळाई योजनेच्या अनुषंगाने माझ्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. याबाबत त्यांनी माफी मागावी अन्यथा महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा साकळाई पाणी योजना कृती समितीच्या अध्यक्षा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी दिला आहे़ 

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्यावेळी पाठिंबा मागण्यासाठी आलेल्या खासदार सुजय विखे यांनी साकाळाई योजनेच्या अनुषंगाने माझ्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. याबाबत त्यांनी माफी मागावी अन्यथा महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा साकळाई पाणी योजना कृती समितीच्या अध्यक्षा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी दिला आहे.नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात साकळाई पाणी योजनेबाबत बोलताना खा़ विखे म्हणाले होते़ ‘तुमच्याकडे देखणा माणूस आला तर त्याला फक्त पहायला जात जा़ साकळाई योजना फक्त सुजय विखेच करू शकतो़ अन्य कोणाचे ते काम नाही’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली होती.विखेंच्या या वक्तव्याबाबत दीपाली सय्यद यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत विखेंबाबत संताप व्यक्त केला़ त्या म्हणाल्या, सुजय विखे हे सुसंस्कारित घराण्यातील असून ते डॉक्टर आणि आता खासदार आहेत़ मात्र महिलांबाबत ते असे वक्तव्य करीत असतील तर त्यांना स्वत:ला नेता म्हणून घेण्याचा काहीच अधिकार नाही़ त्यांनाही आई, बहीण, पत्नी आहे़ लोकसभा निवडणुकीच्यावेळी विखे यांनी बहीण म्हणून माझ्याकडे पाठिंबा मागितला होता़ त्यांना मी पाठिंबाही दिला होता़ मी रिंगणात उतरले म्हणून साकळाई योजनेचा विषय समोर आला आहे़ ही योजना मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदामंत्री गिरिष महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे़ योजनेच्या सर्वेक्षणासाठी मुख्यमंत्री यांनी २ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सुजय विखेंचे मात्र इतर नेत्यांपेक्षा वेगळे आहे. मीच कामे करणार, माझ्यामुळेच हे साकळाई होणार असा त्यांना इगो आहे़ विकास कामे करण्यासाठी त्यांना कुणी अडविले नाही. मात्र महिलांचा अपमान करण्याचा त्यांना कुणी अधिकार दिला? असा सवाल सय्यद यांनी उपस्थित करीत विखे यांनी माफी मागावी अशी मागणी केली़ 

--तर श्रीगोंंद्यातून उमेदवार स्थानिक नेते असेच वागत राहिले तर श्रीगोंदा मतदारसंघातून साकळाई पाणी योजना कृती समिती उमेदवार उभा करेल़, असा इशाराही  सय्यद यांनी यावेळी दिला़ 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर