शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार गांधींविरोधात फिर्याद देणा-या बिहाणी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 20:19 IST

खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात अपहरण आणि खंडणीची फिर्याद देणा-या सालासार फोर्ड शो रुमचे संचालक भूषण बिहाणी यांच्या विरोधात खासदार गांधी यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे शो-रुमबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन उपप्रादेशिक परिवहन विभागाने तोफखाना पोलीस ठाण्यात बिहाणी यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.

अहमदनगर : भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात अपहरण आणि खंडणीची फिर्याद देणा-या सालासार फोर्ड शो रुमचे संचालक भूषण बिहाणी यांच्या विरोधात खासदार गांधी यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे शो-रुमबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन उपप्रादेशिक परिवहन विभागाने तोफखाना पोलीस ठाण्यात बिहाणी यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी बिहाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.नागापूर एमआयडीसीमध्ये सालासार फोर्ड शो-रुम आहे. या शो रुमचे संचालक भूषण बिहाणी यांनी काही महिन्यापूर्वी खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे नगरसेवक पुत्र सुवेंद्र गांधी यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन पोलिसांनी खासदार गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्यासह इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गांधी व बिहाणी यांच्यामध्ये जुना वाद असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. सालासार फोर्ड शो रुममधून २०१५ साली इंडिवर गाडी घेतली होती. पण ती गाडी जुनी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार खासदार दिलीप गांधी यांनी सालासार फोर्ड शो-रुम विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी सालासार फोर्ड शो-रुमचे भुषण बिहाणी यांच्या विरोधात फसवणुकीच्या गुन्हा दाखल केला आहे.या बद्दल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी सांगितले, सालासार फोर्ड शो-रुमला गाडी विक्री प्रमाणपत्र दिले आहे. खासदार दिलीप गांधी यांनी सालासार फोर्ड शो-रुममधून घेतलेल्या गाडीच्या विक्री संदर्भात जुनी गाडी दिल्याची तक्रार आमच्याकडे दिली होती. त्यानुसार या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी फोर्ड इंडिया लिमिटेडला ई-मेल करुन संबंधित चेसी क्रमांकाच्या गाडीची माहिती मागवली. दोन दिवसांपूर्वी आम्हाला फोर्ड इंडियाकडून मेल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. फोर्ड इंडिया लिमिटेडने मेलमध्ये म्हटले आहे की, सालासार फोर्डला या चेसी क्रमांकाची गाडी विकलीच नसून ही गाडी सिक्वेल मोटर्स नागपूर यांना दिली आहे. ही गाडी २०१२ च्या बनावटीची आहे, हे सिद्ध झाले आहे. सालासार फोर्डने २०१५ चे खोटे कागदपत्रे तयार करुन खासदार दिलीप गांधी यांना गाडी विकली आहे. खोटे कागदपत्रे तयार करणे हा मोठा गुन्हा आहे. त्यानुसार ४२०, ४६७, ४६८, ४७१ कलमांतर्गत सालासर फोर्ड शो-रुमचे भूषण बिहाणी यांच्यावर मोटार वाहन निरिक्षक अविनाश दळवी यांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. खोटे दस्तावेज करणे ही शासनाचीही फसवणूक आहे. अशा किती ग्राहकांना सालासार फोर्डने जुन्या गाड्या विकून फसवणूक केली आहे, याचा तपास आम्ही करत आहोत. सालासार फोर्ड शो-रुमला प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नोटीस दिली असून, फोर्ड इंडिया लिमिटेडकडून प्राप्त झालेल्या ई-मेल बाबतचा खुलासा मागविला आहे. या नोटिसीची मुदत उद्या संपत असून, त्यांचे उत्तर आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सालासार फोर्ड शो-रुमवर कारवाई करणार असून, व्यवसाय प्रमाणपत्रही रद्द करणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDilip Gandhiखा. दिलीप गांधीBJPभाजपा