शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

मुळा धरणावरील पुलासाठी रणरणत्या उन्हात आंदोलन

By admin | Updated: April 19, 2017 19:43 IST

रणरणत्या उन्हात गावकऱ्यांनी राहुरी तहसीलवर मोर्चा काढला़ पुलाचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चाच्यावतीने देण्यात आला़

आॅनलाइन लोकमतराहुरी (अहमदनगर) दि़ १९- मुळा धरण झाल्यानंतर ४७ वर्षानंतरही वावरथ,जांभळी,जांभुळबन या गावाकडे जाणाऱ्या पुलाचा प्रश्न मार्गी न लागल्याने त्यासाठी मंगळवारी रणरणत्या उन्हात गावकऱ्यांनी राहुरी तहसीलवर मोर्चा काढला़ पुलाचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चाच्यावतीने देण्यात आला़मिशन प्रांगणातून घोषणा देत मोर्चा राहुरी तहसील कचेरीवर धडकला़ मोर्चाच्यावतीने नायब तहसीलदार सुभाष कदम यांना पुलाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरून गावकऱ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सरकारने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बाचकर यांनी दिला़मुळा धरण झाल्यानंतर पलिकडची गावे राहुरी तालुक्यात समाविष्ट करण्यात आली आहे़ सरकारी व अन्य कामासाठी गावकऱ्यांना राहुरीशी संपर्क साधावा लागतो़ सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेता पुलाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी डॉ़जालिंदर घिगे यांनी केली़सव्वा किलोमीटर पुलासाठी सरकारी पातळीवर हालचाली न झाल्याने पुलाचा प्रश्न धूळखात पडल्याचे विजय तमनर यांनी सांगितले़मोर्चासमोर सभापती अरूण तनपुरे,माजी सरपंच अरूण तनपुरे, हर्षल तनपुरे, प्रदीप पवार, रविंद्र आढाव, वर्षा बाचकर, रत्नमाला मकासरे, सुशिला बर्डे, अलका बाचकर, गवते, पारूबाई चंद यांची भाषणे झाली़ कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या वैशाली नान्नोर, माजी सरपंच दादा बाचकर, अब्दुल शेख, शत्रुग्न पवार, जयराम माने, संदीप कोकाटे, आप्पासाहेब बाचकर, पाटीलबा बाचकर, रामदास बाचकर आदी उपस्थित होते़