शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला बेवारस सोडणारी माता परतली ! या कारणामुळं सोडलं होतं साई दरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 16:52 IST

दोन दिवसापूर्वी सहा महिन्याच्या मुलीला साई दरबारी सोडून गेलेली तिची आई मातृप्रेमापोटी तिला बघायला परत आली. मात्र तिने मुलीला नेण्यास नकार दिला असल्याने पेच तयार झाला आहे.

शिर्डी : दोन दिवसापूर्वी सहा महिन्याच्या मुलीला साई दरबारी सोडून गेलेली तिची आई मातृप्रेमापोटी तिला बघायला परत आली. मात्र तिने मुलीला नेण्यास नकार दिला असल्याने पेच तयार झाला आहे.जळगाव जिल्ह्यातील पारोळ तालुक्यातील या मातेचा एरंडोल तालुक्यातील एका गावातील तरुणाशी झाला होता. या दोघांना एक सात वर्षाची आणखी एक मुलगी आहे. दरम्यान पतीशी वाद झाल्याने ही महिला मामाकडे राहू लागली. मामा या महिलेचे दुसरे लग्न लावून देणार होता. दरम्यानच्या काळात या महिलेचे एकाशी प्रेमसंबध जुळले. त्यातून तिला एक मुलगी झाली. प्रियकर विवाहित असल्याने तो महिलेला, तसेच मुलीला घरात घेईना. पती महिलेला घरात घ्यायला तयार झाला पण मुलीचा स्वीकार करत नव्हता. या पेचातून मार्ग काढण्यासाठी, आपल्या सुखातील अडसर दूर करण्यासाठी या महिलेने या सहा महिन्यांच्या चिमुकलीला ३१ मे रोजी सकाळी थेट साईदरबारी सोडून पोबारा केला.मात्र तीचे आईचे हृदय स्वस्थ बसू देईना. त्यामुळे काल शनिवारी रात्री मुलीला बघण्यासाठी ती तडक साईबाबा संस्थानच्या सुरक्षा कार्यालयात येऊन धडकली. सुरक्षा रक्षकांनी तिची रवानगी पोलिसांकडे केली.पोलिसांनी त्या लहानगीची रवानगी नगरच्या चाईल्ड होममध्ये केली आहे. या महिलेने केलेल्या नात्याच्या गुंतागुंतीमुळे सहा महिन्यांच्या निष्पाप जीवाच्या नशिबी फरफट आली आहे. दरम्यान या महिलेने पोलिसांशी बोलतांना मुलीला परत नेण्याची तयारी दर्शवली आहे. पोलीस तिच्या सांगण्यातील व नात्याची सत्यता पडताळून पाहत आहेत. यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करू, असे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सांगितले.मी फक्त माझ्या मुलीची व्यवस्था लागली की नाही हे बघण्यासाठी आले आहे. तिला अनाथाश्रमात देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. तिला चांगल्या अनाथाश्रमात घाला किंवा कोणीतरी नाव देऊन दत्तक घ्या अशी विनवणी या महिलेने माध्यमांशी बोलताना केली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी