जिल्ह्यामध्ये रोहिणी नक्षत्र सुरू होताच २५ मे पासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वच ठिकाणी वादळी वारा आणि जोरदार पाऊस झाला आहे. आठ दिवसांमध्ये जवळपास सरासरी ६१.२ मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. नगर जिल्ह्यामध्ये रविवारी झालेला पाऊस ७.४ इतका मिलीमीटर होता. जिल्ह्यामध्ये १३ मंडळांमध्ये सर्वाधिक पाऊस आतापर्यंत झालेला आहे. ती मंडळे अशी- नागापूर- १२० वाळकी- १४८, सुपा- १३०, मढेवडगाव- १७४, राजुर- १०५, अकोले-१०६, टाकळी- १०९, शेवगाव- १०६, कोंभळी-११८, कोळगाव -१८३, चिंभळा-१५३, देवदैठण-१०१, बेलवंडी- १३७.
------
जिल्ह्यामध्ये रविवारी झालेला व आतापर्यंत एकूण झालेला सरासरी पाऊस पुढील प्रमाणे आहे.
तालुका /रविवारचा पाऊस/आतापर्यंतचा पाऊस
अहमदनगर /१७.०/ ८७.२
पारनेर/२.९/७१.१
श्रीगोंदा /११.०/१२७.६
कर्जत /०.६/७२.६
जामखेड /८.९/३८.८
शेवगाव /६.७/७३.५
पाथर्डी /१.५/५७.५
नेवासा /१३.६/४२.५
राहुरी /२.५/३३.५
संगमनेर /४.५/३२.६
अकोले /१८.९/७५.७
कोपरगाव /०.३/४८.६
श्रीरामपूर /०.०/२०.३
राहाता /०.४/३०.९
एकूण/७.४/६१.२
-----
तीन दिवस पावसाची विश्रांती
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारी ७ जून रोजी वादळी-वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यामध्ये सोमवारी दुपारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परंतु पुढील तीन दिवस ८, ९, १० आणि ११ जून रोजी नगर जिल्ह्यामध्ये हलका पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मोठ्या स्वरुपात पाऊस होणार नाही. त्यामुळे या चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांना खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार आहे.