शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांचा सर्वाधिक निधी रस्त्यावर खर्च

By admin | Updated: July 25, 2014 00:26 IST

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, अशी ओरड नेहमीच होते़ मात्र जिल्ह्यातील आमदारांनी आपला सर्वाधिक आमदार निधी रस्ते मजबुतीकरणावर खर्च केला आहे़

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, अशी ओरड नेहमीच होते़ मात्र जिल्ह्यातील आमदारांनी आपला सर्वाधिक आमदार निधी रस्ते मजबुतीकरणावर खर्च केला आहे़ मतदारसंघात रस्ते मजबुतीकरण आणि गावोगावी सभागृह उभारण्यात सर्वच आमदार आघाडीवर आहेत.विधानसभेची आचारसंहिता महिनाभरात जारी होईल़ निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला आमदारांनी सुरुवात केली आहे़ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदारांनी गेल्या पाच वर्षांपासूनच विकास कामांचा धडाका लावला होता़ निधी खर्च करण्यात सर्वच आमदार आघाडीवर असल्याचे जिल्हा नियोजनच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे़ विकासाची गती कायम ठेवत पदभार स्वीकारल्यापासून जवळपास ९० टक्के निधी खर्च करून आमदार मोकळे झाले आहेत़ सर्वाधिक निधी मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करण्यावर खर्च केला आहे़ नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांनी १४७ रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत़ शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रस्त्यांची कामे केली़ त्याचबरोबर रस्त्यांवर दिवाबत्तीची १०० कामे पूर्ण केली आहेत़ श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार बबनराव पाचपुते यांनी मात्र आपला सर्वाधिक निधी सामाजिक सभागृहांवर खर्च केला असून, मतदारसंघात काहीप्रमाणात पथदिवेही बसविले आहेत़अकोले मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी सर्वाधिक सभामंडप बांधले आहेत़ कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम शिंदे यांनी सभागृहाची मतदारसंघात सावली केली आहे़ काही ठिकाणी युवकांसाठी व्यायमशाळाही उभारल्या आहेत़ नगर शहर मतदारसंघाचे आमदार अनिल राठोड यांनी मात्र सभागृहाला फाटा देऊन शहरातील रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यावर भर दिला आहे़ शेवगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रशेखर घुले यांनी वाड्या-वस्त्यांवरील रस्ते मजबूत केले आहेत़ उर्वरित निधीतून सभागृह आणि रस्त्यांवर आमदारांनी भर दिला असून, याकामाचे आराखडे जिल्हा नियोजन विभागाला सादर करण्यात आले आले आहेत़ (प्रतिनिधी)कुठे किती सभामंडपकर्जत-जामखेड- ४५श्रीगोंदा- ६४नगरशहर-१शेवगाव-७श्रीरामपूर-६शिर्डी- १०कोपरगाव-११राहुरी- ४७पारनेर- ३६संगमनेर- २०अकोले- ५६रस्त्यांचे मजबुतीकरणश्रीगोंदा- ११नगरशहर- ७५शेवगाव- ४३श्रीरामपूर- ६०कोपरगाव- २२नेवासा- १७७अकोले- ६३व्यायामशाळाकर्जत- १शेवगाव-२दिवाबत्तीश्रीगोंदा- ६१शिडी-१००संगमनेर- ३०संगणकीकरणशिर्डी- २५ श्रीगोंदा- ५कर्जत- लॅपटॉपउर्वरित निधी स्मशानभूमी व शाळांसाठीआमदारांनी रस्ते, सभागृह उभारण्यावर सर्वाधिक खर्च केला आहे़ ही कामे वगळता इतर काही कामे करण्यात आली असून, त्यामध्ये ग्रामपंचायतीचं संगणकीकरण, शाळा बांधकाम, स्मशानभूमी, संरक्षण भिंती आदींचा समावेश आहे़