शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावातील गुंड किरण हजारेसह तेरा जणांवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 16:16 IST

कोपरगाव येथील कुख्यात गुंड किरण माधव हजारे याच्यासह त्याच्या तेरा साथीदारांवर मोक्का अतंर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे संघटित गुन्हेगारीखुनाचा प्रयत्न, दरोडा, वाळूतस्करी, फसवणुकीसह अनेक गुन्हे

अहमदनगर: कोपरगाव येथील कुख्यात गुंड किरण माधव हजारे याच्यासह त्याच्या तेरा साथीदारांवर मोक्का अतंर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आली आहे. हजारे याच्यासह त्याच्या साथीदारांवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरवडा, जबरी चोरी, फसवणूक, मारहाण, वाळूतस्करी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.कोपरगाव तालुका पोलीसांनी हजारे टोळीविरोधात मोक्कातंर्गत कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. शर्मा यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे मंजूरीसाठी पाठविला होता. या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. हजारे व त्याच्या साथीदारांवर कोपरगाव शहर, ग्रामीण, शिर्डी, शिरूर, कोतवाली आदी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे तेरा गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील २० गुन्हेगारी टोळ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. मागील आठवड्यात राहुरी येथील वाळूतस्करांची टोळी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आली आहे.या तेरा जणांना लागला मोक्काकिरण माधव हजारे (वय ३३ रा़ कोकमठाण ता़ कोपरगाव), अक्षय रमेश बारसे (वय २२ रा़ वारी), गणेश माधव हजारे (वय २६ रा़ कोकमठाण,) जयदेव उर्फ जालींदर कारभारी खंडीझोड (वय ४५ रा़ वेस ता़ कोपरगाव),योगेश सुखदेव भड (२८), सुरज प्रकाश ठाकूर (वय २६ रा़ शिर्डी), प्रदिप सर्जेराव जायभाये (वय २४ रा़ नाशिक), देवा उर्फ देवानंद जयदेव उर्फ जालिंदर खंडीझोड (रा़ पोहेगाव), सागर भिमराव धोत्रे, अजय विनायक माहिरे, रवी रामा मोरे, प्रतिक ज्ञानदेव गोंदकर, अनंत सर्जेराव जायभाये (रा़ नाशिक)हजारेसह पाच जण अटकेतदरोड्याच्या गुन्ह्यात किरण हजारे याच्यासह त्याच्याच्या पाच साथीदारांना दोन महिन्यांपूर्वी कोपरगाव पोलीसांनी अटक केली आहे. त्याचे उर्वरित साथीदार फरार असून, पोलीसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. हजारे याच्या टोळीची कोपरगाव तालुका व परिसरात मोठी दहशत आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावPoliceपोलिस