अहमदनगर : शहरातील कोठला मैदान येथून दुपारी बारा वाजता मोहरम सवारी मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ झाला. या मिरवकणुकीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले आहेत. मिरवणुकीत बडे इमाम आणि छोटे इमाम यांच्या सवारी सहभागी झाल्या आहेत. कोठला मैदान येथून छोटे इमाम यांची तर मंगल गेट हवेली येथून बडे इमाम यांची सवारी निघाली़ सवारीत उंच काठीला मोर पिसारे लावून सहभागी झालेले मोरचन लक्ष वेधून घेत होते़ मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोठला मैदान ते मंगलगेट, जुनी महापालिका, कोर्टगल्ली, दिल्ली गेट, बालिकाश्रम रोड या मार्गाने ही सवारी मिरवणूक जाणार आहे. रात्री २ वाजेपर्यंत मिरवणूक मार्गावर सवारी खेळविली जाते़ मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सरबताची व्यवस्था करण्यात आली आहे़ रात्री उशीरा सवारींचे विसर्जन होणार आहे. मिरवणूक मार्गवर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
नगरमध्ये मोहरम मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 14:32 IST