शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मोदी म्हणजे न ऐकणारे हेडमास्तर, शरद पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 01:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आल्यानंतर सर्व सहकारी मित्र चिडीचूप बसतात़ मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही त्यांची चिंता असते़ ते कुणाचेच ऐकत नाहीत.

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आल्यानंतर सर्व सहकारी मित्र चिडीचूप बसतात़ मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही त्यांची चिंता असते़ ते कुणाचेच ऐकत नाहीत़ मोदी म्हणजे कडक हेडमास्तर आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर येथे केली़लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे व्यापाऱ्यांच्या मेळावा झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजीमंत्री मधुकरराव पिचड, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, आमदार जितेंद्र आव्हाड, अरुण जगताप, संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते़ सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळल्याची टीका पवार यांनी केली़ ते म्हणाले, जीएसटी लागू करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता़ पण, त्यावर देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची मते जाणून घेण्यासाठी एक बैठक बोलविण्यात आली़ या बैठकीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडाडून विरोध केला़ मात्र मोदींनी सत्तेवर येताच जीएसटी लागू केला़ कुठलाही निर्णय घेताना संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घ्यावी लागतात़ तेव्हा तो कायदा पूर्णपणे होतो़ परंतु, पंतप्रधान मोदी यांनी कुणाचेच काहीही ऐकून न घेता नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घेतला़ सरकार निर्णय घेताना संवाद साधत नाही, हेच मोठे दुर्दैव आहे़ जनतेशी संवाद ठेवून जो कोणी कारभार करील, त्यांच्याकडे देशाचा कारभार सोपवा, असे आवाहन पवार यांनी केले़सैनिकांच्या ७२ बस जम्मूमधून काश्मीरकडे निघाल्या़ एक जीप येते आणि एका बसला धडक देते़ त्यावेळी स्फोट होऊन ४० जवान शहीद होतात, हे दुर्दैवीच आहे़ देशाचे पंतप्रधान मोदी नेहमी ५६ इंचाची छाती लागते, असे सांगत असतात़ या हल्ल्याच्यावेळी तुमची ५६ इंचाची छाती कुठे गेली होती, असा प्रश्न पवार यांनी केला़राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांचे निलंबन मागे - जयंत पाटील यांची घोषणाअहमदनगर येथील महापालिकेत महापौर निवडणुकीत भाजपाला उघडपणे पाठिंबा दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक निलंबित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच्या सर्व १८ नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगर येथे सायंकाळी केली.डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे २४, भाजपाचे १४, राष्ट्रवादीचे १८ , काँग्रेसचे ५, बसपाचे ४, अपक्ष २, समाजवादी पक्ष १ असे नगरसेवक निवडून आले होते. भाजपाने शिवसेनेला बाजूला ठेवत सत्ता स्थापन करताना काँग्रेस, बसपा, अपक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांचा पाठिंबा घेतला होता. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा आदेश डावलून नगरसेवकांनी भाजपाचे बाबासाहेब वाकळे यांना महापौर निवडणुकीत मतदान केले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर राज्यभरातून टीकेची झोड उठली. राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पक्षातून निलंबित केले होते. मात्र आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप हाच आमचा पक्ष असल्याचे नगरसेवक वारंवार सांगत होते.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पदाधिकाºयांशी चर्चा करण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील नगरमध्ये होते. पाटील यांनी नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा मेळाव्यात केली. पाटील म्हणाले, निलंबित केलेल्या नगरसेवकांनी भाजपाला दिलेली साथ तात्पुरती होती. आम्ही राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही, असे त्यांनी वारंवार संपर्क करून मला सांगितले. बेरजेचे राजकारण करताना काही गोष्टींमध्ये सुधारणा करावी लागते, अशीही पुष्टी जयंत पाटील यांनी जोडली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९