शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात पोलिसांवर जमावाचा हल्ला; तुफान दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 00:27 IST

अहमदनगर येथील राज्य राखीव पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी जमावाने तुफान दगडफेक करून काही खासगी वाहनांचेही नुकसान केले.

ठळक मुद्देअहमदनगर येथील राज्य राखीव पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी जमावाने तुफान दगडफेक करून काही खासगी वाहनांचेही नुकसान केले.

संगमनेर : शहरात नागरिकांची गर्दी उसळल्याने ती रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. ही घटना गुरुवारी ( दि. ६) संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास शहरातील तीनबत्ती चौकात घडली. याप्रकरणी सहा निष्पन्न आरोपींसह अज्ञात दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अहमदनगर येथील राज्य राखीव पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी जमावाने तुफान दगडफेक करून काही खासगी वाहनांचेही नुकसान केले. या घटनेने संगमनेर शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. मात्र, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन बत्ती चौक परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी करणाऱ्या बहुतेक कोणत्याही नागरिकाने मास्क घातलेले नव्हते आणि त्यांच्याकडून फिजिकल अंतर पाळले जात नव्हते. त्यामुळे गस्ती पथकातील राज्य राखीव दलाच्या जवानांनी तेथे जमलेली गर्दी हटवण्याचे प्रयत्न केले. यावेळी जमावातील काही जणांनी पोलिसांवर दगड फेक सुरू केली.  तिनबत्ती चौकातील लिंबाच्या झाडाखाली निवाऱ्यासाठी पोलिसांनी ठोकलेला तंबुही उखडून रस्त्यावर फेकून दिला. तीन बत्ती चौकात सुमारे शंभर ते दिडशे जणांचा मोठा जमाव  होता. हा मोठा जमाव पाहून पोलिसांनी तेथून पळ काढला.  जमावाने काही खाजगी वाहनांचेही नुकसान केल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सलमान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी जुबेर हॉटेलचा चालक, तेथील सर्व कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीर खान, मोहम्मद हनीफ रशीद शेख, अरबाज शेख या निष्पन्न आरोपींसह अन्य दहा ते पंधरा जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 337 यासह दंगलीचे कलम 143, 147 तसेच 188, 269 व क्रिमिनल अमेंडमेंट कायदा 1932 चे कलम 7 प्रमाणे वरील सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर निष्पन्न आरोपींसह अन्य बहुतेकजण पसार झाले आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस