शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

'कृतघ्न आहेत सगळे; अण्णांमुळे सत्तेत आले, त्यांनाच विसरले'; राज ठाकरेंची चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 13:20 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या अण्णा हजारे आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

ठळक मुद्देराज ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवालांवर निशाणा5 वर्ष झाली लोकपालबाबत अद्याप कारवाई नाही - राज ठाकरेअण्णांच्या आंदोलनामुळेच मोदी आणि केजरीवाल सत्तेत

अहमदनगर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. 'कृतघ्न आहेत सगळे; अण्णांमुळे सत्तेत आले, त्यांनाच विसरले'; अशी चपराक राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घेतला समाचार अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकपाल निर्णयावरुन जोरदार हल्लाबोल चढवला. राज ठाकरे म्हणाले की, ''या नालायकांसाठी अण्णा जिवाची बाजी लावू नका. ही अत्यंत खोटारडी, ढोंगी माणसं आहेत. नरेंद्र मोदी या माणसावर विश्वास ठेवून यापुढे कोणतीही गोष्ट करू नका. केवळ अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळेच मोदी आणि त्यांचे सहकारी आज सत्तेवर बसले आहेत. 

केजरीवाल यांच्यावरही साधलं शरसंधान आपल्या जाहीर भाषणात राज ठाकरेंनी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ''आज खरंतर केजरीवाल यांनी येथे यायला हवं होतं. केवळ अण्णांमुळे दिल्लीतील सत्तेवर तुम्ही बसले आहात. नाहीतर कोण केजरीवाल? कोणी ओळखत होतं का?. ही सगळी कृतघ्न माणसं आहेत. 

...गाडून टाकू या सर्वांना - राज ठाकरेयावेळेस राज ठाकरे यांनी अण्णांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत राज ठाकरे म्हणाले की,'' अण्णा तुम्ही कुठे जिवाची बाजी लावताय. या उपोषण सोडा, आपण बाहेर पडू...गाडून टाकून या सर्वांना.यावेळेस राज ठाकरेंनी 2013मध्ये पंतप्रधान मोदी यांनी लोकपालसंदर्भात केलेल्या ट्विटचाही दाखल दिला. 

''लोकपाल बिल पास झाले पाहिजे, आमचा त्याला पाठिंबा आहे, अशा आशयाचे याच नरेंद्र मोदींचे 18 डिसेंबर 2013चे ट्विट आहे. आज पाच वर्ष झाली, पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. या लोकपालासाठी काँग्रेसला शिव्या घालणारे हे भाजपावाले... हे मोदी... आज काय करताहेत?. म्हणून मी अण्णांना एवढंच सांगितलं अण्णा फार ताणून नका'', असे म्हणत राज ठाकरे पंतप्रधान मोदींवर बरसले आहेत. 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेanna hazareअण्णा हजारे