शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 17:46 IST

अहिल्यानगरमध्ये झालेल्या या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

Ahilyanagar Accident: अहिल्यानगरमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. आमदार सुरेश धस यांच्या मुलाने सोमवारी रात्री कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस रात्रीच्या सुमारास अहिल्यानगर पुणे महामार्गावरुन प्रवास करत होता. दुचाकीस्वार जातेगाव फाट्यावरुन येत असताना सागर धस यांच्या गाडीने त्याला जोरदार धडक दिली ज्यात नितीन शेळके याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी सागर धसविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याने सोमवारी कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली. नितीन शेळके असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सुपा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागर धसच्या गाडीने त्याला जोरदार धडक दिली. सागर धस हे रात्री आष्टीवरून पुण्याच्या दिशेला निघाले होते. अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला. दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागरच्या कारनं त्याला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये सागर धसच्या गाडीचेही मोठं नुकसान झालं असून त्यावरुन धडक किती जोरदार बसली याचा अंदाज येत आहे.

सागर धस याच्या एमजी हेक्टर या गाडीखाली येऊन अहिल्यानगरमधील नितीन शेळके या तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वाराला दवाखान्यात नेईपर्यंतच त्याचा मृत्यू झाला. मात्र सोमवारी रात्री गुन्हा घडल्यानंतरही मंगळवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुच होती. सागर धस या सुरेश धस यांचा धाकटा मुलगा आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून  सागर हा स्वतः गाडी चालवत होता की अजून कुणी चालवत होतं याची माहिती घेतली जात आहे. 

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरSuresh Dhasसुरेश धसBJPभाजपा