शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

फेसयोगामुळे मिस इंडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:04 IST

हल्ली चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी मुली सर्रास कॉस्मेटीकचा वापर करतात.

विनोद गोळेहल्ली चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी मुली सर्रास कॉस्मेटीकचा वापर करतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसेही खर्च करतात. पण केवळ फेस योगा करून आपल्या सौंदर्यात भर टाकत भारताची सर्वात सुंदर स्त्रीचा असा ‘मिस इंडिया’ किताब मिळवणा-या मानसी गुलाटी या मुलींच्या योगामधील जागतिक दर्जाच्या आयकॉन बनल्या आहेत.फेसयोगावरच लक्ष केंद्रीत करीत त्यांनी देश, परदेशात योगाचे धडे दिले आहेत. त्यांचे कर्तृत्वमय जीवन खास ‘लोकमत’साठी त्यांनी उलगडले आहे.मानसी गुलाटी या राळेगणसिध्दीत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी संत निळोबाराय विद्यालयातील विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. मूळच्या हैद्राबाद येथील मानसी गुलाटी यांनी वयाच्या चौथ्या वर्षीपासून योगा करण्यास प्रारंभ केला़ त्यांचे आजोबा सत्यपालसिंह यांच्याकडून त्यांनी प्रथम हे धडे घेतले. तरूणवयातही त्यांनी योगा सुरूच ठेवला़ त्यांच्या चेहºयालाच सौंदर्याची देणी लाभली असल्याने त्यांनी वयाच्या तेवीसाव्या वर्षी युवतींच्या सौंदर्याची परीक्षा करणा-या मिस इंडिया स्पर्धेत २०१५ मध्ये भाग घेतला. या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की मानसी यांनी स्वत: या स्पर्धेत उतरताना सौंदर्य वाढविण्यासाठी कोणतेही कॉस्मेटीक किंवा फाउंडेशन लावले नाही, तर त्यांनी लहानपणापासून कायम ठेवलेला फेसयोगावरच भर दिला. फेसयोगामध्ये कपाळ, डोळे, ओठ, गाल यांच्याबरोबरच योगामधील महाक्रिया योग करत राहील्या.योगामुळे त्यांच्या चेह-यावरील नैसर्गिक सौंदर्याला आणखी झळाळी मिळाली. मिस इंडियाच्या अंतिम स्पर्धेत त्यांना विजेतेपद मिळाले. मिस इंडियाचा मुकुटही त्यांना लाखो भारतीयांसमोर प्रदान करण्यात आला़योगा केल्याने स्वत:चे शरीरही निरोगी राहते. याशिवाय मनही प्रसन्न राहत असल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि त्यातूनच आपले चेह-याचे सौंदर्य खुलत जाते असे मानसी सांगतात.चेहरा काळा पडत जाणे, पिंपल्स येणे, कातडी निस्तेज दिसणे असे प्रकार होत राहतात़ माणसांसह प्रत्येक मुलींनी, महिलांनी आता कॉस्मेटीक वापरण्याऐवजी फेसयोगाचाच वापर करणे आवश्यक असल्याचे मानसी सांगतात. दैनंदिन जीवनातील केवळ पाच ते दहा मिनिटेच या योगासाठी लागतात मग आपण का वेळ देउ शकत नाही असा प्रश्नही मानसी यांनी केला़ योगामुळे अनेक आजारांपाासुन दूर राहण्यास मदत होते. आतापर्यंत योगावर सात ते आठ पुस्तके त्यांनी प्रकाशित केली असून योग प्रशिक्षणासाठी त्यांनी आतापर्यंत देशासह अनेक देशांमध्येही दौरे केले असून आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरYogaयोगासने प्रकार व फायदे