महसूलमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली समविचारी नेते एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST2021-02-13T04:21:06+5:302021-02-13T04:21:06+5:30
जिल्हा बँकेवर अॅड. माधवराव कानवडे व गणपतराव सांगळे यांची बिनविरोध निवड झाली. येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ...

महसूलमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली समविचारी नेते एकत्र
जिल्हा बँकेवर अॅड. माधवराव कानवडे व गणपतराव सांगळे यांची बिनविरोध निवड झाली. येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात शुक्रवारी (दि. १२) अमृत उद्योग समुहाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक बाजीराव खेमनर होते. कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, संचालक इंद्रजीत थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, लक्ष्मणराव कुटे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रामदास वाघ, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, युवक काँग्रेसचे उत्तर अहमदनगर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे आदी उपस्थित होते.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, मारूतराव घुले, आबासाहेब निंबाळकर, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे यांच्यासह त्या काळातील सहकार व समाजनेत्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी बँक जोपासली. अत्यंत शिस्तप्रिय व काटेकोरपणे नियोजन करत ही बँक आज राज्यात नव्हे; तर आशिया खंडात अग्रकमांकाची बनली, असेही आमदार डॉ. तांबे म्हणाले. विलास कवडे, ॲड. नानासाहेब शिंदे, सुरेश थोरात, नवनाथ अरगडे, मोहन करंजकर, रमेश गुंजाळ, प्रा. बाबा खरात, रमेश गफले यांसह अमृत उद्योग समुहातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष ओहोळ यांनी केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. बाजार समितीचे सभापती खेमनर यांनी आभार मानले.
-----------
फोटो नेम :