शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत येथे दूध उत्पादकांचा मेळावा : शेतक-यांनी दूध धंद्यात बदल करावा- राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 18:40 IST

दूध व्यवसाय सर्वात जास्त जोखमीचा असून दूध धंदा आता बदलत आहे, तसा बदल शेतकºयांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी कर्जत येथे बोलताना केले.

कर्जत : दूध व्यवसाय सर्वात जास्त जोखमीचा असून दूध धंदा आता बदलत आहे, तसा बदल शेतक-यांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी कर्जत येथे बोलताना केले.गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने दूध उत्पादकांचा मेळावा कर्जत येथील सदगुरू मिल्क अ‍ॅन्ड मिल्क या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दूध उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नामदेव राऊत हे होते. यावेळी संयोजक शंकरराव नेवसे, उध्दवराव नेवसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, कल्याणी नेवसे, अशोक खेडकर, काका धांडे, सचिन कातोरे, डॉ.कांचन खेत्रे, बी. बी. बो-हाडे, बापूसाहेब नेटके, अमृत लिंगडे, लहु शिंदे, प्रशांत बुध्दिवंत, रामदास हजारे, राम ढेरे, रवींद्र थोरात, राहुल सोनमाळी यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.प्रा. राम शिंदे म्हणाले, कर्जत तालुका हा दुष्काळी तालुका होता. येथे शेतीला पूरक म्हणून दूध धंद्याची गरज होती हे ओळखून शंकर नेवसे व त्यांचे बंधू उध्दव नेवसे यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. ४०० लीटरवरील व्यवसाय आज ७० हजार लिटर केला आहे. ही एक क्रांती आहे, असे ते म्हणाले.यावेळी कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, अशोक खेडकर उध्दवराव नेवसे, शंकरराव नेवसे यांची भाषणे झाली. दूध उत्पादकांच्या वतीने पालकमंत्री राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री आणि अ‍ॅडव्हान्स

पालकमंत्री प्रा राम शिंदे म्हणाले, राजकारणामध्ये येण्याअगोदर मी दुधाची डेअरी पण टाकली होती. दूध डेअरी सुरू करताना शेतक-यांनी दूध घालावे यासाठी त्यांना अ‍ॅडव्हान्स द्यावा लागतो. त्याप्रमाणे मी अ‍ॅडव्हान्स दिला होता. मात्र कालांतराने राम शिंदे यांची दूध डेअरी बंद पडली आणि शेतक-यांना दिलेला अ‍ॅडव्हान्स आजतागायत अनेक वेळा मागणी करूनही परत मिळाला नाही, हे सांगताच जोरदार हशा झाला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदेKarjatकर्जत