शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

दोनशे गावांना मीटरने पाणी

By admin | Updated: July 25, 2014 00:26 IST

अहमदनगर पाणी पुरवठा योजनेमार्फत चालविण्यात येणाऱ्या ३६ नळ पाणी पुरवठा योजनेतील २०६ गावांना मीटरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलव्यस्थापन समितीच्या बैठकीत झाला

अहमदनगर : जिल्हा परिषद संयुक्त पाणी पुरवठा योजनेमार्फत चालविण्यात येणाऱ्या ३६ नळ पाणी पुरवठा योजनेतील २०६ गावांना मीटरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलव्यस्थापन समितीच्या बैठकीत झाला. जिल्हा नियोजन विकास निधीतून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून यासाठी १ कोटी ६ लाख रुपयांचा निधीची मागणी नोंदविण्यात आली आहे. शंभर टक्के नळ जोडणी यंत्र बसविणाऱ्या ग्रामपंचायतींना सौर ऊर्जेची जोड मिळणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षेतखाली गुरूवारी जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीची बैठक झाली. यात भविष्यात प्रादेशिक पाणी योजना, नळ पाणी योजना आणि स्वतंत्र पाणी योजनांचे पाणी मीटरव्दारे मोजून देण्याबाबत चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या संयुक्त पाणी पुरवठा योजनेमार्फत ३६ नळ पाणी पुरवठा योजना चालविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात या योजनेत समाविष्ट असणाऱ्या गावांना मीटरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.यासाठी जिल्हा नियोजनमधून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १ कोटी ६ लाख रुपयांची मागणी पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्याकडे करण्यात आलेली आहे. शंभर टक्के नळ जोडणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पाण्याचा पंप चालविण्यासाठी सौर ऊर्जेचा जोड देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड करण्यात येणार आहे. या योजनेसाठी १ कोटी ६८ लाख रुपयांची मागणी करण्यात येणार आहे. शेवगाव-पाथर्डी या तालुक्यातील ५८ गावाचा तालुका घटक धरून व पाथर्डी शहर आणि शेवगाव शहर वगळून अन्य गावांसाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर करण्यासाठी सर्वेक्षण आणि अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाथर्डी शहरात नगरपालिका असून शेवगावमध्ये प्रस्तावित असल्याने या दोघांना यातून वगळण्यात आलेले आहे.बैठकीला उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती बाबासाहेब तांबे, शाहुराव घुटे, हर्षदा काकडे, सदस्य अ‍ॅड. सुभाष पाटील, सुनील गडाख, निमंत्रित सदस्य केशव भवर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, कार्यकारी अभियंता कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)खोले यांचा पदभार काढला१पावसाळ्यात ३६१ टँकरव्दारे दररोज ९५६ खेपाव्दारे २७९ वाड्या आणि १ हजार ३३२ गावातील जनतेची तहान भागविण्यात येत आहे. भर पावसाळ्यात सहा लाख आठ हजार जनतेला सरकारी पाण्यावर अवलंबून राहवे लागत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला संभाव्य पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. २शेवगाव-पाथर्डी पाणी योजनेचे वादग्रस्त शाखा अभियंता बबन खोले यांची चौकशी करून त्यांच्याकडून पाणी योजनेचे कामकाज काढून घेण्याचा निर्णय सुमारे महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नव्हती. गुरूवारच्या बैठकीत सभापती काकडे यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त करत, प्रशासनावर टीका केली. त्यामुळे तातडीने खोले यांचा कार्यभार काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.३राज्य शासनाने पाणी पुरवठा योजनांसाठी असणारी दहा टक्के लोकवर्गणीची अट शासनाने रद्द केली आहे. याच निर्णयाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरूस्तीच्या योजनांना दहा टक्के वर्गणीची अट देखील लागू राहणार नसल्याचे अध्यक्ष लंघे यांनी सांगितले.