शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत साईसंस्थान व्यवस्थापनाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:37 IST

जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या संस्थानाला अशांततेची लागण झाली आहे. विधीमंडळाच्या सुरक्षेलाही लाजवेल अशा अभुतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत व्यवस्थापनाची मंगळवारी रात्री बैठक पार पडली.

शिर्डी : जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या संस्थानाला अशांततेची लागण झाली आहे. विधीमंडळाच्या सुरक्षेलाही लाजवेल अशा अभुतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत व्यवस्थापनाची मंगळवारी रात्री बैठक पार पडली.आजवर संस्थान व्यवस्थापनाशी मनमोकळा संवाद साधू शकणा-या विविध राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनाही मंगळवारी पोलिसांच्या उपस्थितीत व मोजक्याच प्रतिनिधींना भेटण्याची वेळ आली. संस्थान विरोधी झालेल्या विविध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही उपाययोजना केली. गेल्यावेळी झालेली तोफफोड लक्षात घेवून अध्यक्षांची गाडीही संस्थान भांडाराच्या गोदामात ठेवण्यात आली होती.गेल्या काही दिवसात निर्माण झालेला तणाव व दिवसेंदिवस मंदिराची होणारी बदनामी लक्षात घेवून संस्थान अध्यक्ष हावरे यांनी आलेल्या प्रत्येक शिष्टमंडळाशी भेट घेवून संवादाच्या माध्यमातून कोंडी फोडण्याचा निर्णय घेतला. हावरे यांच्या या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत करीत त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.व्यवस्थापनाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे व आनंद भोईटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्यासह पोलीस, शिघ्रकृती दलाचे जवान व संस्थान सुरक्षा रक्षक यांनी साईनिवास इमारतीला गराडा घातला होता़ त्रिस्तरीय सुरक्षेबरोबरच सर्वत्र बॅरेगेटींग लावून अडथळे उभे करण्यात आले होते. संस्थान व पोलिसांचे कॅमेरे प्रत्येक हालचाल टिपीत होते. संस्थानचे अध्यक्ष डॉ़सुरेश हावरे पोलीस व भाजपा पदाधिका-यांच्या गराड्यात पुढील गेटने पायीच सभास्थळी गेले. मात्र काही विश्वस्तांनी मागील गेटने जाणे पसंत केले. अध्यक्ष व विश्वस्तांना भेटण्यासाठी प्रत्येक पक्षाचे किंवा शिष्टमंडळाचे केवळ चारच प्रतिनिधी आत सोडण्यात आले. काहींची तर मध्ये जाताना तपासणीही करण्यात आली. पोलिसांच्या उपस्थितीतच अध्यक्षांनी काही मिनीटे प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनाही सभागृहात जाण्यापासून रोखण्यात आले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी