शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीत देश-विदेशातील भाविकांचा मेळा; जागतिक साई मंदिर विश्वस्त परिषदेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 18:14 IST

पंढरपुरात जसा विठ्ठल भक्तांचा मेळा एकवटतो, तसा साई मंदिर विश्वस्तांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने साईभक्तांचा मेळा राज्य, देश, भाषेच्या सगळ्या सीमा तोडून बंधुभावाने साईनगरीत एकवटला आहे.

शिर्डी : पंढरपुरात जसा विठ्ठल भक्तांचा मेळा एकवटतो, तसा साई मंदिर विश्वस्तांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने साईभक्तांचा मेळा राज्य, देश, भाषेच्या सगळ्या सीमा तोडून बंधुभावाने साईनगरीत एकवटला आहे. ‘माझा माणूस जगात कोठेही असला, तरी चिमणीच्या पायाला दोर बांधून ओढतात, तसे मी त्याला ओढून आणीन’ असे साईबाबा म्हणत. त्याची प्रचिती या निमित्ताने आली.जागतिक साई मंदिर विश्वस्तांच्या परिषदेचे हे दुसरे वर्षे आहे. देश-विदेशातून आलेल्या भाविकांचा व संस्थान व्यवस्थापनाचा उत्साह कायम असला, तरी येणा-या प्रतिनिधींच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या वर्षी या परिषदेसाठी देशभरातून अकराशे मंदिरांचे प्रतिनिधी आले होते. तर यंदा ही संख्या साडेदहाशे आहे. याशिवाय विदेशातून गेल्यावेळी ४४ मंदिरांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यंदा ही संख्या १९ वर आली आहे. यंदा प्रतिनिधींची संख्या दुपटीने वाढेल असा व्यवस्थापनाचा कयास होता. मात्र देश-विदेशात सार्इंचा प्रचार-प्रसार करणा-या चंद्रभानू सत्पती गुरुजींनी दोन दिवसांपूर्वी हैद्राबादेत अशाच कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे येथील संख्येत घट झाली असल्याची शक्यता आहे.आजच्या परिषदेसाठी कॅनडा, हाँगकाँग, जपान, मलेशिया, नेदरलँड, श्रीलंका, लंडन व अमेरिकेतून १९ साई मंदिरांचे प्रतिनिधी आले आहेत. यात कॅनडा तीन, अमेरिका नऊ, श्रीलंकेतील दोन, तर अन्य देशांतून प्रत्येकी एक मंदिराचा प्रतिनिधी आला आहे. भारतातील जवळपास २४ राज्यांतील मंदिरांचे प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यात सर्वाधिक आंध्र प्रदेशातून ३१७, तर चंदीगड, हिमालच प्रदेश, केरळ या राज्यांतून सर्वाधिक कमी प्रत्येकी एक मंदिराचा प्रतिनिधी आला आहे. महाराष्ट्रातूनही जवळपास दीडशे साई मंदिराचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.देशभरात जवळपास आठ हजार, तर विदेशात पाचशे साई मंदिरे आहेत़ त्या अनुषंगाने केवळ अकरा टक्के मंदिराच्या प्रतिनिधींनीच संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. साईनगरच्या मैदानात या परिषदेसाठी भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. यात एलईडी स्क्रिन बसविण्यात आल्या आहेत. संस्थान प्रकाशित पुस्तके, सीडी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. सर्व प्रतिनिधींची निवास, भोजन व दर्शनाची व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा