शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ४१ जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह; शिर्डीत संस्थात्मक विलगीकरण कक्षात ५५ व्यक्ती     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 14:14 IST

नगर जिल्ह्यात व राहाता तालुक्यासाठी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी आहे. रविवारी लोणी परिसरातून नगरला कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या ४१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी सोमवारी (दि.६ एप्रिल) दिली.

शिर्डी : नगर जिल्ह्यात व राहाता तालुक्यासाठी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी आहे. रविवारी लोणी परिसरातून नगरला कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या ४१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी सोमवारी (दि.६ एप्रिल) दिली.यातील ३२ व्यक्तींना आता चौदा दिवसांसाठी साईबाबा संस्थानच्या साईआश्रम इमारतीत उभारलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. उर्वरित लो रिस्क असलेल्या ९ व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात येत आहे. शिर्डीतील या कक्षातील आकडा आता ५५ वर पोहचला आहे. दिल्लीतील कार्यक्रमात सहभाग घेवून आलेला इंडोनेशियातील व्यक्ती कोल्हार, भगवतीपूर, लोणी खुर्द, लोणी बुद्रूक, हसनापुर, दाढ बुद्रूक, पाथरे व हनंमतगाव या सात गावातील पंचवीस व्यक्तींच्या संपर्कात आला होता. या व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले असता त्यातील एका व्यक्तीच्या स्त्रावाचा अहवाल पॉझिटीव्ह तर चोवीस जणांचा निगेटिव्ह आला आहे. त्यातील तेवीस व्यक्तींना शिर्डीत संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर रविवारी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसिलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ संजय गायकवाड, लोणीचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत पाटील आदींनी या सात गावांची पाहणी केली. लोणी बुद्रूकमधील जो एकजण पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या संपर्कात आलेल्या ४१ व्यक्तीना रविवारी तपासणीसाठी नगरला पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे.दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका. जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे साठेबाजी करू नका. स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील धान्य वितरण सुरू आहे. येत्या दहा तारखेपासून प्रत्येक व्यक्तीस पाच किलो तांदूळ विनामूल्य देण्यात येणार असल्याचे तहसीलदार हिरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीcorona virusकोरोना वायरस बातम्याrahaataराहाता