शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
3
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
4
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
5
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
6
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
7
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
8
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
9
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
10
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
11
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
12
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
13
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
14
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
15
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
16
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
17
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
18
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
19
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
20
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!

वैद्यकीय तपासणीस देसाई यांचा नकार

By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST

अहमदनगर : शिंगणापुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता म्हणून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना शिंगणापुरच्या बाहेर काढले.

अहमदनगर : शिंगणापुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता म्हणून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना शिंगणापुरच्या बाहेर काढले. त्यानंतर साडेतीन वाजता देसाई यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेतून वैद्यकीय तपासणीसाठी आणले. मात्र, कोणतीही तपासणी करण्यास देसाई यांनी नकार दिल्याने त्यांना नगरच्या हद्दीबाहेर पोलीस संरक्षणातून काढून देण्यात आले.जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घ्या, अशी पोलिसांनी त्यांना विनंती केली. मात्र, ती विनंती त्यांनी धुडकावून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच ठिय्या दिला. त्यानंतर देसाई यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या महिला कार्यकर्त्यांची महिला पोलिसांनी उचलबांगडी करीत पोलीस व्हॅनमध्ये बसविले. सायंकाळी ५.१५ मिनिटांनी देसाई यांना रुग्णालयाच्या बाहेर व्हॅनमधून बाहेर काढण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मला मारहाण करण्यात आली. ही बाब गंभीर आहे. याबाबत मी राज्यपाल यांच्याकडे तक्रार करणार आहे, असे भानुदास मुरकुटे यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)मुरकुटे यांचा गडाख यांच्यावर आरोपदेसाई यांच्यासोबतच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची वैद्यकीय तपासणी केली. शिंगणापूर येथे त्यांना सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली. यावर रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले. यावेळी मुरकुटे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रा वाघ यांनी घेतलेले नमते धोरण अजिबात पटले नाही. चौथऱ्यावरील दर्शन प्रकरणी ‘वाघाची बिल्ली’ झाली. त्यामुळेच नगरसेविका मंजुषा सिद्धार्थ मुरकुटे, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष व माजी सभापती सुनीता गायकवाड, अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, अप्पासाहेब दुशिंग यांच्यासह १० महिलांना घेवून दर्शन घेण्यासाठी गेलो. महिलांना चौथऱ्यावर चढून दर्शन घेता आले पाहिजे, ही आमची वैयक्तिक भूमिका आहे. मात्र, तेथे दर्शन घेण्यास विरोध करून आम्हाला धक्काबुक्की, मारहाण करण्यात आली. पुरोगामी विचार केवळ भाषणांमध्ये मांडणारे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीच सुरक्षा रक्षकांमार्फत मारहाण केली. महिलेला अध्यक्षपदी बसवून महिलेमार्फत महिलांवरच अन्याय करण्याचे पाप गडाख करीत आहेत. या प्रकरणी शिंगणापुरच्या विश्वस्तांनी राजीनामे दिले पाहिजेत. दरम्यान, मुरकुटे यांना शिंगणापुरमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश मोरे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी मुरकुटे यांचा जबाब नोंदवून घेतला. पोलिसांनीच आम्हाला संरक्षणात दर्शन दिले पाहिजे होते, असेही मुरकुटे यांनी स्पष्ट केले.शिंगणापुरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची पुरेपूर दक्षता पोलिसांनी घेतली आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणूनच देसाई यांना शिंगणापुरमध्ये ताब्यात घेतले. त्यांना नगर येथे वैद्यकीय तपासणीसाठी आणले. मात्र, त्यांनी तपासणीसाठी नकार दिला. देसाई यांना तसेच लोकांना कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही, याची पोलिसांनी काळजी घेतली. मारहाण, धक्काबुक्की याबाबत त्यांना तक्रार द्यायची असेल तर ती घेवून योग्य ती कारवाई केली जाईल.-पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षकशिंगणापूर देवस्थान आणि ग्रामस्थांनी गुढीपाडव्याच्या दिवशी कावडीने आणलेले गंगाजल चौथऱ्याखालूनच अर्पण करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारे शिंगणापूर देवस्थान हे राज्यातील एकमेव देवस्थान आहे. महिला आणि पुरुष या समानतेसाठी गावाने दहा पावले मागे जाण्याचा निर्धार केला. यापूर्वी गुढीपाडव्याला पुरुष कावडीधारक चौथऱ्यावर जावून शनिदेवाच्या शिळेवर गंगाजल अर्पण करीत होते. मात्र भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनानुसार यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता कोणीही चौथऱ्यावर जात नाही़-सयाराम बानकर, निमंत्रित सदस्य, महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषद