शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

भाजपा-राष्ट्रवादी देऊ शकतात शिवसेनेला धक्का'; सर्वाधिक जागा मिळूनही महापौरपद हुकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 12:20 IST

९ डिसेंबरला झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर नगरकरांचे लक्ष्य महापौर निवडीकडे लागले आहे.

अहमदनगर : ९ डिसेंबरला झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर नगरकरांचे लक्ष्य महापौर निवडीकडे लागले आहे. २८ डिसेंबरला सकाळी ११ वाजता मनपाच्या सभागृहात नव्या महापौर, उपमहापौरांची निवड होणार आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी याबाबत आदेश काढला आहे. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेत शिवसेना(२४), भाजप (१४), राष्ट्रवादी(१८), काँग्रेस(५), बसपा(४), सपा(१), अपक्ष(२) असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये बेबनाव झाल्याने त्यांची युती होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला महापौर पदापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये महापौर पदासाठी अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे यांची नावे चर्चेत आहेत. महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव मातोश्रीवरून घोषित होईल, असे उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले.

भाजपकडून भैया गंधे, बाबासाहेब वाकळे, स्वप्निल शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र भाजपाच्या निष्ठावंत शिलेदाराला ही संधी मिळू शकते. महापालिकेतील त्रिशंकू अवस्था पाहता महापौर नेमका कोणाचा होणार याकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे. दरम्यान शिवसेना-भाजपाचे नगरसेवक सहलीवर रवाना झाले असून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बुधवारी नाशिकला गटनोंदणीसाठी रवाना झाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAhmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूक