शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

अनेक ग्रामपंचायतींमध्ये उलथापालथ; गड राखण्यात मात्तबर यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 15:16 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल हाती येत असून, यापैकी बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. यातील दहा ग्रामपंचायती बिनविरोध ...

अहमदनगर : जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल हाती येत असून, यापैकी बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. यातील दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. काही ठिकाणी मात्तबरांनी गड राखण्यात यश मिळविले आहे.माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या काष्टी गावात पाचपुतेंनी सत्ता राखली असून, बेलवंडी येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार गटाच्या सदस्यपदाच्या सर्व जागा जिंकल्या़ पण सरपंचपदाने हुलकावणी दिली आहे. घोगरगाव येथे भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या गटाला धक्का बसला असून, तेथे राष्ट्रवादीने गड जिंकला आहे.कोपरगाव तालुक्यात भाजपच्या कोल्हे गटाने सर्वाधिक १३ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला असून, राष्ट्रवादीच्या काळे गटाला ८ ग्रामपंचायतींची सत्ता मिळाली आहे़ काँगे्रस व शिवसेनेच्या ताब्यात प्रत्येक १ ग्रामपंचायत गेली असून, दोन ग्रामपंचायतींवर अपक्षांनी बाजी मारली आहे़पारनेर तालुक्यात शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या गटाच्या ताब्यात ७ ग्रामपंचायती आल्या असून, राष्ट्रवादीकडे ४, काँगे्रस २ तर इतरांनी तीन ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे़

नगर तालुक्यात धक्कादायक निकाल

नगर तालुक्यात २७ ग्रामपंचायतींची मतमोजणी पूर्ण झाली असून, २७ सरपंच विजयी तर २६० सदस्य विजयी झाले आहेत़ नगर तालुक्यात भाजप तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष केशव बेरड यांच्या पॅनलला धक्का बसला असून भाजप आमदार शिवाजी कर्डिले समर्थक बाजार समितीचे उपसभापती रेवणनाथ चोभे यांच्या पत्नी रेश्मा चोभे पराभूत झाल्या आहेत़ नगर तालुक्यातील नागरदेवळे, वाळकी, नारायणडोह, उक्कडगाव, आठवड, पांगरमल अशा ग्रामपंचायतींवर कर्डिले गटाचे वर्चस्व राहिले़

नगर तालुक्यातील सरपंच

1) वाळकी- स्वाती बोठे, 2) नागरदेवळे - सविता पानमळकर, 3) नेप्ती - सुधाकर कदम, ४) कौडगाव - धनंजय खर्से, ५) पिंपळगाव कौडा - सतिष ढवळे, ६) जखणगाव - सविता कर्डिले, ७) सोनेवाडी-चास - स्वाती सुंबे, ८) दहिगाव - मधुकर म्हस्के, ९) वडगाव तांदळी - सविता ठोंबरे, १०) साकत - जाईबाई केदारे, ११) आठवड - राजेंद्र मोरे, १२) सारोळा बद्धी - सचिन लांडगे, १३) मदडगाव - सुनिता शेडाळे, १४) सोनेवाडी (पिला) - मोनिका चांदणे, १५) आगडगाव - मच्छिंद्र कराळे, १६) नांदगाव - सुनिता सरड, १७) टाकळी खातगाव - सुनील नरवडे, १८) राळेगण -निलेश साळवे, १९) खातगाव टाकळी - संगीता कुलट, २०) शेंडी - सिताराम दाणी, २१) कापूरवाडी - संभाजी भगत, २२) सारोळा - भारती कडूस, २३) बाबुर्डी बेंद - अशोक रोकडे, २४) रांजणी - बाळासाहेब चेमटे, २५) नारायणडोह - सविता गायकवाड, २६) पांगरमल- बाप्पूसाहेब आव्हाड, २७) उक्कडगाव - नवनाथ म्हस्के़ 

श्रीगोंद्यातील सरपंच

बेलवंडी -सुप्रिया पवार, तरडगव्हाण - नवनाथ डोके, घोगरगाव -बाळासाहेब उगले, तांदळी दुमाला -संजय निगडे़ 

पाथर्डी तालुक्यातील सरपंच

1) कोळसांगवी - वसंत पेटारे, 2) मोहरी - कल्पजीत डोईफोडे, 3) जिरेवाडी - उमाजी पवार, 4) वैजूबाभूळगाव - उज्वला गुंजाळ, 5) कोल्हार - शोभा पालवे, 6) सोनोशी - विष्णू दौंड, 7) वडगांव - रंजना धनवे, 8) कोरडगाव - विष्णु देशमुख, 9) भालगाव - मनोरमा खेडकर, 10) तिसगांव - काशिनाथ पाटील लवांडे़ 

जामखेड तालुक्यात भाजपचे वर्चस्व

पालकमंत्री प्रा़ राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यातील राजुरी, रत्नापुर, शिऊर या तीनही ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या असून, राजुरी ग्रामपंचायतीत गणेश कोल्हे, रत्नापूर ग्रामपंचायतीत दादासाहेब वारे व शिऊर ग्रामपंचायतीत हणमंत उतेकर हे सरपंचपदी विराजमान झाले आहेत़