अहमदनगर: नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची अवघ्या पाच महिन्यातच शासनाने बदली केली असून त्यांच्या जागी सोलापूर येथील मनोज पाटील यांची नियुक्ती झाली आहे.शासनाने गुरुवारी पोलीस अधिक्षक, पोलीस उपायुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीतील अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. अखिलेश कुमार सिंह यांना अद्यापपर्यंत बदलीचे ठिकाण देण्यात आले नसून त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आलेले आहे. येत्या दोन दिवसांत नवीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे पदभार घेणार असल्याचे समजते. अखिलेश कुमार सिंह यांनी एप्रिल महिन्यात नगरचा पदभार स्वीकारला होता.
अवघ्या पाच महिन्यांत नगरच्या पोलीस अधीक्षकांची बदली, मनोज पाटील नवे अधीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 00:00 IST