शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रांगोळी काढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 15:24 IST

अंगणात रांगोळी काढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीहून आलेल्या दोन चोरट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. १९) सकाळी सव्वा सातच्या सुमारास शहरातील अभिनव नगर येथे घडली. या परिसरातील एका घराबाहेर बसविलेल्या सीसीटिव्हीत हे चोरटे कैद झाले आहेत.

संगमनेर : अंगणात रांगोळी काढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीहून आलेल्या दोन चोरट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. १९) सकाळी सव्वा सातच्या सुमारास शहरातील अभिनव नगर येथे घडली. या परिसरातील एका घराबाहेर बसविलेल्या सीसीटिव्हीत हे चोरटे कैद झाले आहेत.

     नवीन नगर रस्ता संगमनेर बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहे. येथील अभिनव नगरमध्ये अरूंधती विजय रेंघे यांचे घर आहे. त्या कुटुंबासमवेत तेथे राहतात. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका असलेल्या रेंघे या सकाळी सव्वा सातच्या सुमारास अंगणात रांगोळी काढत होत्या. रांगोळी काढून झाल्यानंतर त्या घरात जात असताना दुचाकीहून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडत त्यांना जोराचा धक्का दिला. त्यानंतर हे चोरटे नवीन नगर रस्त्याकडे गेले. काही क्षणात हा प्रकार घडल्याने रेंघे गोंधळून गेल्या. त्यांच्या मानेला जखम झाली आहे. रेंघे यांची मुलगी ॲड. मृदुला बंदिष्टे यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांना घडला प्रकार फोनद्वारे कळविला.

    देशमुख यांनी अभिनव नगर येथे भेट दिली. चोरटे कैद झालेले सीसीटिव्हीतील फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साधारण सव्वा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असल्याचे रेंघे यांनी सांगितले. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरCrime Newsगुन्हेगारी