शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ज्याच्याशी ठरवशील लग्न, त्याला मारून टाकील; साता-याच्या तरुणाने फेसबुकवरुन दिला नगरमधील मुलीच्या भावाला दम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 13:43 IST

बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून तरूणीच्या नावे तिच्याच भावाला धमकीचे मेसेज पाठविल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यात सातारा येथील तरूणाविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून तरूणीच्या नावे तिच्याच भावाला धमकीचे मेसेज पाठविल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यात सातारा येथील तरूणाविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सातारा येथील आकाश शरद सोनटक्के याने शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील २४ वर्षीय तरूणीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून तिचा फोटो वॉलपेपरवर ठेवला़ या अकाऊंटच्या माध्यमातून त्याने ३० आॅगस्ट रोजी तरूणीच्या भावाला मेसज करून ‘तू तुझ्या बहिणीचे लग्न कुठेही ठरविण्याचा प्रयत्न केला तर मी ते लग्न मोडून टाकेल तसेच ज्या मुलाशी तू तुझ्या बहिणीचे लग्न ठरवशील त्याला मी मारून टाकेल’ अशी धमकी दिली. या प्रकरणी सदर तरूणीने येथील मंगळवारी येथील सायबर पोलीस ठाण्यात सोनटक्के याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुनील पवार हे करत आहेत.महिलांना त्रास देण्यासाठी सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून बदनामी करण्याचे प्रकार वाढले आहेत़ व्हॉटसअ‍ॅप, टिष्ट्वटर अथवा फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोंचाही गैरवापर होत आहे.

महिन्याला दहा तक्रारींचे प्रमाण

सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी, धमकी अथवा ब्लॅकमेलिंगच्या घटनांबाबत येथील सायबर पोलीस ठाण्यात महिन्याला किमान दहा तक्रार अर्ज दाखल होत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या बाबत सर्वाधिक या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर वर्षभरात सायबर पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुनील पवार व त्यांचे टीमने अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे उघडकिस आणून आरोपींना अटक केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFacebookफेसबुकahmednagar policeअहमदनगर पोलीस