चांदेकसारे- डाऊचखुर्द गुरसळ वस्तीवर अर्जुन होन या शेतकºयाच्या पाच शेळ्या बिबट्याच्या नर व मादीने केल्या फस्त केल्या. यामध्ये शेतकºयाचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनअधिकाºयाने त्वरीत पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी परिसरातील रहिवाशांनी मागणी केली आहे. होन यांनी बचत गटाचे कर्ज काढुन गायी व शेळ्या खरेदी केल्या. त्यांचा उदरनिर्वाह गायी व शेळ्यावर होता. गुरुवारी रात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान शेजारील मते यांच्या डाळींबाच्या बागेतुन येवुन बिबट्या व मादीने शेळाच्या खुराड्यात येवुन झडप मारली व तीन शेळ््या व दोन बोकडे फस्त केली.कोपरगावचे आमदार अशुतोष काळे यांनी पाहाणी करुन वनक्षेत्रपाल संतोष जाधव, नामदेव सांगळे, कामगार तलाठी सुरेश जाधव यांना शेळ्यांचे शवविच्छेदन करुन होन यांना जास्तीत जास्त मदत मिळवुन देण्याच्या सूचना केल्या. यावेळी सरपंच संजय गुरसळ, शंकर गुरसळ, रोहिदास होन, विष्णु गुरसळ, सुधाकर होन, कल्याण गुरसळ, तुळशिदास गुरसळ, शफीलाल सैय्यद गंगाधर, काळे कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गिरमे, शफीलाल सैय्यद आदी उपस्थित होते.
बिबट्याच्या नर व मादीने पाच शेळ्या केल्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 13:24 IST