शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: आमदार लहामटे यांना होती मंत्रिपदाची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 05:30 IST

अकोले मतदारसंघातील आमदार डॉ. किरण लहामटे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न शनिवारी अजित पवारांकडून झाला. मात्र, त्यांच्याशी संपर्क टाळून व आपले लोकेशन दडवून ठेवत लहामटे हे मुंबईत पक्षाच्या बैठकीत पोहोचण्यात यशस्वी झाले.

- सुधीर लंकेअहमदनगर : अकोले मतदारसंघातील आमदार डॉ. किरण लहामटे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न शनिवारी अजित पवारांकडून झाला. मात्र, त्यांच्याशी संपर्क टाळून व आपले लोकेशन दडवून ठेवत लहामटे हे मुंबईत पक्षाच्या बैठकीत पोहोचण्यात यशस्वी झाले.लहामटे यांच्याशी अजित पवार यांच्या स्वीय सहायकांनी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. लहामटे यांनी या एकाही कॉलला प्रतिसाद दिला नाही. कालांतराने भ्रमणध्वनीच बंद करत ते नॉट रिचेबल झाले. त्यामुळे अजित पवारांच्या यंत्रणेने त्यांच्यासोबत असलेल्या विनय सावंत यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ‘अजित दादांना आमदारांशी बोलायचे आहे. आमचे आमदारांशी बोलणे करुन द्या. त्यांना मंत्री करावयाचे आहे’ अशी थेट आॅफर समोरुन देण्यात आली. लहामटे हे सध्या कोठे आहेत? हे लोकेशनही शोधण्याचा प्रयत्न समोरुन झाला. मात्र, सावंत यांनीही यास प्रतिसाद न देता आपला भ्रमणध्वनी बंद केला. त्यामुळे लहामटे यांच्याशी संपर्क करण्याचे सर्व प्रयत्न असफल ठरले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस