पारनेर (जि. अहमदनगर) : शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून चार पैसे मिळायला लागले तर लगेच या सरकारने निर्यातबंदी केली. या सरकारला शेतीविषयी अजिबातही आस्था नाही. त्यामुळे भाजपवाल्यांना दारात उभे करु नका, असे आवाहन राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथील सभेत केले.अहमदनगर जिल्ह्यातील राष्टÑवादीच्या प्रचाराचा नारळ पवारांनी फोडला. दिलीप वळसे पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, आम्ही शेतकरी व सर्वसामान्य माणसाची बाजू घेतो तर आम्हालाही ईडी, सीबीआयची भीती दाखवली जाते. मात्र, तुरुंगात टाकले तरी सर्वसामान्यांच्या हिताचे बोलणे मी थांबविणार नाही. या सरकारला धडा शिकविण्याची ही वेळ आहे.अनेक विमा कंपन्यांचा शेतकऱ्यांना काहीही फायदा व्हायला तयार नाही, असे ते म्हणाले.
Maharashtra Election 2019 : भाजपवाल्यांना दारात सुद्धा उभे करू नका - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 04:49 IST