बुरुडगाव रोडवरील स्काय ब्रिज गृहप्रकल्पात सर्व परिवार एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतो. याठिकाणी लेडिज क्लबच्या वतीने गणपतीची महापूजा आणि महाआरती करण्यात आली. यावेळी संध्या मुथा, राजश्री मुथा, अमिता मुथा, पूजा मेहर, संगीता चंगेडिया, निकिता पटवा, लीला पटवा, नम्रता पटवा, अनुराधा झंवर, उषा लुणिया, दीपाली भंडारी, सविता गांधी, स्वीटी गांधी, दीप्ती मुथा, निर्मला कटारिया, मानसी गुगळे, राखी चंगेडिया, निर्मला मुथा, कोमल कोठारी, मैनाबाई मुथियान, पूनम भंडारी, वर्षा भंडारी, रेखा मुथा, संगिता बोथरा, कविता बोथरा आदी उपस्थित होत्या.
सर्व महिलांनी बाप्पा मोरयाचा गजर करीत तल्लीन होऊन आरती म्हटली. जालना येथील आरती सेटिया, आकांक्षा सेटिया, पम्मी सेटिया, मनीषा सेटिया, पुणे येथील श्रुती बंब यांनीही स्कायब्रिजला भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांमुळेही येथील वातावरण प्रसन्न बनते, अशी भावना सिध्दार्थ छाजेड यांनी व्यक्त केली.