शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

जिल्हा मराठा संस्थेचे माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 13:21 IST

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त व माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे आज निधन झाले.

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त व माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे आज निधन झाले. ते ‘आबा’ या नावाने परिचित होते. त्यांच्या निधनामुळे अहमदनगर जिल्ह्यात मोठी पोकळी निर्माण झाली. नगर तालुक्यातील वाटेफळ या छोट्याशा गावात माधवराव मुळे यांचा १९३२ साली जन्म झाला.  त्यांनी गावातच किराणा दुकान सुरु केले. १९४७ साली झालेल्या रझाकार चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्यानंतर १९५२ मध्ये नगरमध्ये येत आडत व्यवसाय सुरु केला. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय झाले. या कालावधीत डाव्या विचारांशी जोडले गेले. १९५८ मध्ये अहमदनगर जिल्हा मराठा समाज संस्थेवर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर नगर तालुका बाजार समितीची निवडणूक लढवली. १९६० नगर तालुका बाजार समितीचे सभापती झाली. बाजार समितीची दगडी कमान त्यांनी स्वत: बैलगाडीतून दगड आणून उभारली. माळीवाडा भागातून १९६७ साली नगरपालिकेची निवडणूक लढवली. इंदिरा काँग्रेस तालुकाध्यक्ष पदही भुषविले. त्यानंतरअहमदनगर जिल्हा मराठा समाज संस्थेच्या शिवाजी ग्राहक भांडारचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. १९८० साली संस्थेचे सहसचिव झाले. १९८४ मध्ये डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे मानद सचिव म्हणून काम पाहिले. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १९८५ संचालक होते. त्यानंतर जिल्हा मराठा संस्थेचे सचिव म्हणून काम पाहिले. पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. १९९० मध्ये विधानसभेचे जनता दलाच्या तिकिटावर नगर-नेवासा मतदारसंघातून निवडणूक लढवली. हॉटेल व्यवसायातही उतरले. अनेक परदेश दौरेही त्यांनी केले. १० एप्रिल २०१२ रोजी ते जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष झाले. सलग ६ वर्षे त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. माधवराव मुळे यांचे पार्थिव संस्थेच्या आवारात आज सायंकाळी ५ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी ६ वाजता अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर