शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिंद्रनाथ देवस्थानने १५०  कुटुंबांना दिला आधार; अन्नधान्य, किराणा वाटप, गावागावात केली जंतुनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 19:25 IST

आष्टी (जि. बीड) तालुक्यातील सावरगाव येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध गावातील भटक्या, आदिवासी, गरीब गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य, किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

अहमदनगर : आष्टी (जि. बीड) तालुक्यातील सावरगाव येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध गावातील भटक्या, आदिवासी, गरीब गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य, किराणा मालाचे वाटप करण्यात आले. याशिवाय अनेक गावात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जंतुनाशक फवारणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच जण लढा देत आहेत. अनेक भटके , आदिवासी कुटुंब  गावागावात अडकून पडले आहेत. या कुटुंबीयांना आधार मिळावा, यासाठी सामाजिक  जाणीवेतून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. याच भावनेतून मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या वतीने गेल्या आठ दिवसापासून भटक्या, आदिवासी, गरजू कुटुंबीयांना ज्वारी, गहू , बाजरी, तांदूळ  धान्यासह किराणा मालाचे वाटप केले जात आहे. जवळपास १५० कुटुंबीयांना आतापर्यंत मदतीचे वाटप केले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अन्नधान्य व रोख स्वरुपात मदत गोळा केली होती. यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, सरपंच राजेंद्र म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, अशोक म्हस्के, विठ्ठल म्हस्के, आयुब शेख व कर्मचाºयांनी पुढाकार घेतला होता. मदत गोळा झाल्यानंतर या मदतीचे त्यांनी नियोजनपूर्वक वाटप केले.   दरम्यान, रविवारी (दि.५ एप्रिल) हिवरा येथील २२ कुटुंबातील १०२ व्यक्तींना मदतीचे वाटप केले. यातील १८ कुटुंब जडीबुटीचा व्यवसाय करणारे आहेत. तर चार कुटुंब रोजंदारीवर काम करणारे आहेत. याप्रसंगी कार्यकर्ते मुरलीधर लगड, अशोक लगड, अ‍ॅड. योगेश लगड, भारत चव्हाण, राहूल लगड, मारुती लगड व इतर उपस्थित होते. सॅनेटायझर्स, डेटॉल साबणाचे वाटपआष्टी तालुक्यातील गंगादेवी शेडाळा, सावरगाव, शेंडगेवाडी, शिंदेवाडी, घाटदेवळगाव, पिंपळगाव घाट, अरणविहिरा, तागडखेल परिसरातील ३५ गावात मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सॅनेटायझर्स, डेटॉल साबण वाटप केले. यावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्याविषयी प्रबोधन केले. तर काही गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.मदतीचे आवाहनकोरोनामुळे अनेक भटके, आदिवासी, गरीब कुटुंब अनेक गावात अडकून पडले आहेत. त्यांना रोजगार नसल्याने उपासमार सुरू आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या आधाराची आज खरी गरज आहे. तरी विविध संस्था, दानशूर व्यक्ती, युवकांंनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने केले आहे. 

आज प्रत्येक गावात गरजू, गरीब लोकांना कोणतेही रोजगाराचे साधन नाही. त्यांची उपासमार होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सर्वांनी आपल्या परिसरातील अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन हिवरा येथील कार्यकर्ते अ‍ॅड.योगेश लगड यांनी केले आहे.  

टॅग्स :Beedबीडashti-acआष्टीSocialसामाजिकcorona virusकोरोना वायरस बातम्या