शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर- विद्यार्थिनीवर बलात्कार, हत्याप्रकरणी तिघांना फाशी; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 12:41 IST

 पारनेरमधील लोणी-मावळा येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज, शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देलोणी मावळा (ता. पारनेर) येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिच्यावर अत्याचार करुन खून करणा-या तिघा आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली.शुक्रवारी सकाळी साक्षीपुरावे तपासून जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

अहमदनगर : पारनेरमधील लोणी-मावळा येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज, शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. संतोष विष्णू लोणकर (वय ३६), मंगेश दत्तात्रय लोणकर (३०) दत्तात्रय शंकर शिंदे (२७) अशी दोषींची नावं आहेत.

या प्रकरणातील तीन आरोपींनी कट रचून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. सरकारी पक्षाने समोर आणलेले साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्यानुसार आरोपींना मृत्युदंड हीच शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली.लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खूनखटल्यात सोमवारी (दि़ ६) जिल्हा न्यायालयात दोष सिद्ध झाला. मंगळवारी आरोपी व सरकारी पक्षाच्या वतीने शिक्षेवर युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर या खटल्याचा निकाल १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता देण्यात येणार असल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी सांगितले होते. त्यानुसार आज न्यायाधीश केवले यांनी आरोपींना शिक्षा सुनावली. 

नेमकी घटना काय ?लोणी मावळा येथे २२ ऑगस्ट २०१४ रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खुनाची घटना घडली. या घटनेच्या आधी संतोष लोणकर याने सदर मुलीची छेड काढून तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २२ ऑगस्टला संतोष लोणकरसह मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे यांनी तिचा पाठलाग केला. पीडित मुलीवर तिघांनी अत्याचार केला. त्यानंतर तिच्या नाका-तोंडात चिखल घातला. संतोष लोणकर याने मुलीच्या डोक्यावर स्कू्रड्रायव्हरने वार केले. मंगेश लोणकर याने तिच्या डोक्यात दगड घातला, तर दत्तात्रय शिंदे याने मुलीचे पाय पकडून ठेवले होते. तसेच मुलीच्या मृत्यूनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावर सर्वत्र चिखल टाकला होता. आरोपींनी अतिशय विकृत पद्धतीने हे कृत्य केले. या घटनेमुळे संपूर्ण नगर जिल्हा हादरून गेला होता. त्यामुळे या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली होती. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCourtन्यायालय