शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

Lok Sabha Election 2019 : मित्र पक्षांच्या गोटात काय चाललंय? : गटबाजी संपल्याने काँग्रेसमध्ये ‘जोर लगा के’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 15:52 IST

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विखेंचे बंड झाले आहे.

अण्णा नवथरअहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विखेंचे बंड झाले आहे. विखे गट काँग्रेसमधून बाहेर पडल्याने बाळासाहेब थोरात यांच्या गटातील सर्व कार्यकर्ते राष्टÑवादीच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लावले आहे.अहमदनगर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस- राष्ट्रवादीत टोकाचा संघर्ष झाला़ परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस जागा लढविण्यावर ठाम राहिली़ निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलली़ डॉ़ सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला़ जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये पूर्वीपासूनच विखे व थोरात असे दोन गट आहेत़ विखेंच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमधील गटबाजीचा शेवट झाला अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. आता शतप्रतिशत बाळासाहेब थोरात यांचेच नेतृत्व राहील. त्यामुळे संघटना बांधणीला मदत होईल, अशी काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांची भावना आहे. दोन्ही नेत्यांमध्ये पक्षात नेहमीच दबून राहिलेल्या कार्यकर्त्यांचा मार्ग मोकळा झाल्याने ते उत्साहाने निवडणुकीला सामोरे जात आहेत़थोरात गटाचे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून पळत आहेत़ जिल्ह्यावर पकड निर्माण करण्याची संधी थोरात यांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांची यंत्रणाही कामाला लागली आहे. सत्यजित तांबे यांनी गत विधानसभेला नगरमधून सुमारे २५ हजार मते घेतली होती. ही सर्व ताकद ते राष्टÑवादीच्या पाठिशी उभी करतील.पारनेर : पारनेर तालुक्यातील विखे समर्थक युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरलेले आहेत़ माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना मानणारे ज्ञानदेव वाफारे, ज्ञानदेव बाबर, गंगाराम बेलकर हे आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा प्रचार करत आहेत़ राष्ट्रवादीची ताकद या तालुक्यात अधिक असून, त्यांच्या जोडीला काँग्रेसचे नेतेही आहेत़श्रीगोंदा : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार श्रीगोंदा तालुक्यातील आहेत़ ते विखे यांच्यासोबत भाजपमध्ये गेले आहे़ माजीमंत्री थोरात यांच्या समर्थक जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, त्यांचे पती राजेंद्र नागवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, प्रशांत दरेकर हे संग्राम यांच्या प्रचारात सक्रीय आहेत.नगर शहर : नगर शहर विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे पाच नगरसेवक आहेत़ त्यापैकी दोन नगरसेवक विखे यांच्या प्रचारात सक्रिय आहेत़ उर्वरित नगरसेवक काँग्रेससोबतच असून, ते आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार करत आहेत़ काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे प्रमुखही आघाडीसोबत आहेत़कर्जत- जामखेड : जामखेड तालुक्यातील थोरात गटाचे बाळासाहेब साळुंके, जमिर सय्यद, रमेश अजबे आघाडीसोबत आहेत़ कर्जत तालुक्यातील शहाजीराजे भोसले, प्रवीण घुले, अ‍ॅड़ शेवाळे हे आघाडीच्या उमेदवारासाठी कामाला लागले आहेत़शेवगाव- पाथर्डी : पाथर्डी तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे़ शेवगाव राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे़ या दोन्ही तालुक्यातील विखे समर्थक भाजपच्या उमेदवाराचे काम करत आहेत़ विखे यांना मानणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे राष्ट्रवादीत आलेल्या आहेत़ त्यामुळे शेवगाव तालुक्यातील राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे़नगर- राहुरी : नगर तालुक्यातील माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य प्रताप शेळके, रावसाहेब शेळके, ज्ञानदेव दळवी, संपतराव म्हस्के, जयंत वाघ हे काँग्रेससोबत असून, ते आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत़ राहुरी तालुक्यात जयंत कुलकर्णी, बाळासाहेब आढाव, बाळासाहेब चव्हाण, बाबासाहेब धोंडे आघाडीसाठी काम करत आहेत़सर्व मित्रपक्ष, विविध संघटनांचा प्रचारात सहभागउमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करत असलो तरी मित्र पक्ष राष्ट्रीय काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, दलित महासंघ या प्रमुख पक्षांसह शेतकरी संघटना, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय आहेत़ सर्वच तालुक्यांतील राष्ट्रवादी व मित्र पक्ष काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित प्रचार करत असून, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़- संग्राम जगताप, उमेदवार, महाआघाडी, अहमदनगर लोकसभा

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्स