शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोतूळ शहरात लॉकडाऊनचे वाजले बारा; बाजारात दीड हजार लोकांची गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 14:00 IST

कोतूळ शहरात सकाळी सात ते दहा या कालावधीत थेट मुख्य चौकात भाजी बाजार भरतो. बुधवारी या बाजारात मोठी गर्दी करीत किमान एक हजार लोक हजेरी लावत असल्याने लॉकडाऊनचे बारा वाजले आहेत. 

कोतूळ  : शहरात सकाळी सात ते दहा या कालावधीत थेट मुख्य चौकात भाजी बाजार भरतो. बुधवारी या बाजारात मोठी गर्दी करीत किमान एक हजार लोक हजेरी लावत असल्याने लॉकडाऊनचे बारा वाजले आहेत.     कोतूळ गावात सध्या ७५ जण होम कोरोंटाइनर आहेत. तर आसपासच्या चाळीस गाव डांग भागात हा आकडा एक हजारांच्या वर आहे. पुणे, मुंबई व परराज्यातील कामगार या भागात आपल्या स्वगृही परतले असल्याने आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, स्थानिक पोलीस प्रशासनाने त्यांना होम कोरोंटाइन केले आहे. मात्र कोतूळ  ही परिसराची व्यापारीपेठ असल्याने कोतूळात परगावातील असंख्य लोक सकाळी भाजी व इतर खरेदीसाठी सकाळी सात ते दहा या कालावधीत मोठी गर्दी करतात. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची सोशल डिस्टन्स न पाळता हा बाजार भरत असल्याने कोतूळ गावात धोक्याची घंटा वाजली आहे.   कोतूळ पोलीस स्टेशनचे सुनील साळवे व विजय खुळे  व ग्रामविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला. परंतू रात्री उशिरापर्यंत पहारा देणारे कर्मचारी सकाळी नऊ दहा वाजता नाकेबंदी करतात. त्या आगोदर तीस, पस्तीस भाजी व्यापारी मुख्य रस्त्यावरच दुकाने थाटल्याने गर्दी वाढते. विशेष म्हणजे यात एकही शेतकरी नसून परगावातील व्यापारी हा माल विकतात. तर शासनाने कोरोना बचावासाठी ठरवून दिलेले नियमांना पायदळी तुडवले जाते.

‘लोकमत’ने पाच दिवसांपूर्वी अकोलेचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांना ही माहिती दिली. मात्र भाजी विक्रेत्यांना कोणतेही नियम नाहीत. ती जीवनावश्यक वस्तू असल्याने कोठेही विक्री करू शकतात. त्यांना कोणतेही निर्बंध नाहीत असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस