श्रीगोंदा : बेलवंडी स्टेशन परिसरातील संदीप अरकत या शेतक-याच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला करत फडशा पाडला. शुक्रवारी पहाटे बिबट्याने हल्ला केला.२२ फेब्रुवारीच्या रात्री साधारण २ ते ३ वाजनेच्या सुमारास कुत्री भुंकू लागल्याने अरकत कुटुंबातील लोक जागे झाले. त्यांनी बाहेर पाहिले असता गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला केला होता. शेळी नेत असतांना तिच्या मागे एक छोटे पिल्लू होते. ती मादी बिबट्या असावी, असे संदीप अरकस यांनी सांगितले. या घटनेनंतर बेलवंडी व आसपासच्या परिसरात लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
बेलवंडी परिसरात बिबट्याने दिले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 09:54 IST