शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

लोकमत मुलाखत:राष्ट्रपती पुरस्कार विजेते मंगलारम यांच्याकडून धडे, गोपाळवाडी शाळेत स्वावलंबी शिक्षणाची पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:29 IST

अहमदनगर : मुलांना केवळ खडू-फळा, वही-पेन, वर्गपाठ-गृहपाठ एवढ्या चौकटीतल्या शिक्षणात बांधून न ठेवता त्यांना आकाशातल्या पक्ष्यांप्रमाणे खुले सोडले, लिखापढीपेक्षा कृती करून दाखवली, त्यांना पुस्तकी किडा करण्यापेक्षा स्वावलंबी, रोजच्या व्यवहाराचं ज्ञान दिलं की मुले आनंदाने, आपसूक शिकतात, हा मंत्र आहे गोपाळवाडी (ता. राहुरी) येथील आदर्श शिक्षक नारायण मंगलारम यांचा. त्यांच्या या वैविध्यपूर्ण शिक्षणपद्धतीची दखल घेतल्यानेच यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : मुलांना केवळ खडू-फळा, वही-पेन, वर्गपाठ-गृहपाठ एवढ्या चौकटीतल्या शिक्षणात बांधून न ठेवता त्यांना आकाशातल्या पक्ष्यांप्रमाणे खुले सोडले, लिखापढीपेक्षा कृती करून दाखवली, त्यांना पुस्तकी किडा करण्यापेक्षा स्वावलंबी, रोजच्या व्यवहाराचं ज्ञान दिलं की मुले आनंदाने, आपसूक शिकतात, हा मंत्र आहे गोपाळवाडी (ता. राहुरी) येथील आदर्श शिक्षक नारायण मंगलारम यांचा. त्यांच्या या वैविध्यपूर्ण शिक्षणपद्धतीची दखल घेतल्यानेच यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.

मराठी, इतिहास, इंग्रजी या तीन विषयांची पदव्युत्तर पदवी घेतलेले शिक्षक मंगलारम सध्या राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेत तिसरी, चौथीचे वर्गशिक्षक आहेत. मूळचे अहमदनगर येथील असलेले मंगलारम यांनी डी. एड. केल्यानंतर २००३पासून शिक्षकी पेशाला सुरूवात केली. प्रारंभीची १४ वर्षे त्यांनी पैठण तालुक्यात विविध शाळांवर सेवा दिली. २०१७ मध्ये आंतरजिल्हा बदलीने ते राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी शाळेत आले. शिक्षकी पेशाच्या सुरूवातीपासून मंगलारम यांनी हसतखेळत आनंददायी शिक्षण देण्यावर भर दिला. मुलांना पुस्तकातून शिकवण्यापेक्षा कृतीतून, दृकश्राव्य पद्धतीने शिकवले तर विद्यार्थी ते कैक पटीने ग्रहण करतात, हे मानसशास्त्र आहे. त्यामुळे आपण हीच पद्धत वापरतो, असे ते सांगतात. त्यांना कलेची आवड असल्याने नाटक, एकांकिका, गायन, खेळ, कविता वाचून ते मुलांना जिंकून घेतात. त्यांच्या इतिहासाच्या तासाची तर विद्यार्थी चातकाप्रमाणे वाट पाहतात. कारण इतिहास शिकवताना ते प्रत्येक विद्यार्थ्याला एकेका पात्रात बसवून त्यांच्याकडून संवाद बोलून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासासह अभिनयाचाही एक तास होतो.

नेमके हेच मुलांना भावते. लोकशाहीतील निवडणूक पद्धत विद्यार्थ्यांना अनुभवता यावी म्हणून ते वर्गातच दोन गटात निवडणूक घेतात. मग दोन गट, त्यांचे चिन्ह, प्रचार, प्रत्यक्ष बटन दाबून मतदान, नंतर मतमोजणी व निकाल. हीच त्यांची अध्ययनपद्धती आहे. मुलांच्या अंगभूत क्षमतांचा विकास करण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी आहे. त्या कौशल्याला ते नावीन्यपूर्ण उपक्रम व तंत्रज्ञानाची जोड देतात. आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून त्यांनी खेड्यापाड्यातील या मुलांना शाळेत बसून जगाची सफर घडवली आहे. स्काईपच्या माध्यमातून गोपाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी २५ देशांतील २०० पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आहे. रशिया, अमेरिका व युक्रेनमधील शाळांबरोबर मुलांनी पत्रांची देवाणघेवाण केली. दक्षिण कोरियामधील शाळेने गोपाळवाडीच्या मुलांसाठी कल्चरल बॉक्स पाठवला आहे.

ग्लोबल नगरीच्या माध्यमातून मुलांनी महाराष्ट्रातील परंतु सध्या जगभर कामानिमित्त असणाऱ्या आपल्या भूमिपुत्रांशी गप्पा मारल्या. यातून विद्यार्थ्यांना संवादकौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षणपद्धतीची ओळख झाली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना यंदा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारावर त्यांनी मोहोर उमटवली असून येत्या शिक्षकदिनी दिल्लीत राष्ट्रपतींकडून त्यांचा सन्मान होणार आहे.सहभाग आणि कार्य४कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात (एटीएम) महाराष्ट्रचे राज्य सहसंयोजक.४महाराष्ट्राच्या चार राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाच्या आयोजन नियोजनात सक्रिय सहभाग - नियमित रक्तदाता , गेल्या २० वर्षात ७० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले.

-----------निशंक : सोसायटी फॉर एज्युकेशन आर्ट अँड कल्चरचे ,महाराष्ट्र राज्य सचिव. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ (बालभारती ) च्या इंग्रजी विषय सदस्य.एनसीईआरटीच्या ( दिल्ली) कला विभागात मास्टर ट्रेनर म्हणून निवड.एनसीईआरटीकडून मॉडेल स्कूल म्हणून गोपाळवाडी शाळेची निवड आणि - फेब्रुवारी २०१९ मध्ये एनसीईआरटी कला पथकाची शाळेला भेट.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducationशिक्षण