शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, पहाटेच्या सुमारास घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 11:22 IST

सदरचा परिसर बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास मानला जातो. त्यामुळे अनेकदा बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या धडकेत गतप्राण होण्याच्या घटना घडताहेत.

ठळक मुद्देया धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यु झाला. यानंतर मृत बिबट्याला पाहण्यासाठी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी गर्दी केली.

घारगाव ( जि. अहमदनगर) : नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या नर जातीचा बिबट्या ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदरचा अपघात बुधवारी (दि.१५) पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास घडला. नाशिक-पुणे महामार्गावरील आळेखिंड, माहुली, चंदनापुरी, कर्हे घाट आदी परिसरात बिबट्यांचा वावर नेहमीच आढळून येतो. 

सदरचा परिसर बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास मानला जातो. त्यामुळे अनेकदा बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या धडकेत गतप्राण होण्याच्या घटना घडताहेत. बुधवारी पहाटेच्या साडे तीन वाजेच्या सुमारास सुमारे पाच वर्षांचा नर बिबटया रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणा-या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यु झाला. यानंतर मृत बिबट्याला पाहण्यासाठी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी गर्दी केली. येथील स्थानिकांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी वन विभागाचे वनपाल रामदास थेटे यांना अपघाताबद्दल माहिती दिली. 

दरम्यान, सदरची माहिती मिळताच वनपाल रामदास थेटे, वनरक्षक सुभाष धानापुरे, सुजाता ठेंबरे, वनमजुर दिलीप बहिरट, वनकर्मचारी यादव यांनी घटनास्थळी धाव घेत बिबटयाच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृत बिबट्या ताब्यात घेतला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर चंदनापुरी रोपवाटिकेत मृतदेहाचे दहन करण्यात आले आहे. दरम्यान, वाहनांच्या वेगमर्यादेचे वारंवार उल्लंघन होत असल्याने अनेक वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो आहे. 

टॅग्स :Accidentअपघातleopardबिबट्याAhmednagarअहमदनगर