बहिरवाडी शिवारात बिबट्या जेरबंद
By admin | Updated: April 14, 2017 17:13 IST
शुक्रवारी पहाटे चार वाजता वन विभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या अलगद जेरबंद झाला.
बहिरवाडी शिवारात बिबट्या जेरबंद
नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील बहिरवाडी शिवारात माकोटा वस्ती येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. शुक्रवारी पहाटे चार वाजता वन विभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या अलगद जेरबंद झाला. जेरबंद झाल्यानंतर बिबट्याच्या डरकाळ्यांनी परिसर दणाणून गेला होता. बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.बहिरवाडी शिवारात बिबट्याच्या वास्तव्याविषयीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये आल्यानंतर वन विभागाने तातडीने हालचाली केल्या. वनक्षेत्रपाल साहेबराव ढेरे यांनी बिबट्याचे ठसे व माग पाहून बहिरवाडी येथील सोनटक्के वस्तीवर पिंजरा लावला. गुरुवारी दुपारी वन विभागाने लावलेल्या पिंजºयात शुक्रवारी पहाटे चार वाजता बिबट्या पिंजºयात अलगद जेरबंद झाला. बहिरवाडी येथील बाळासाहेब पंडित यांनी वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती.