लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: सुरक्षा रक्षक मंडळाकडील नोंदीकृत सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीबाबत पंधरा दिवसांत कार्यवाही करावी, अन्यथा कारखाने व अस्थापनांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी दिला आहे.
सुरक्षा रक्षक मंडळाकडील नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे शासकीय व खासगी अस्थापनांना बंधनकारक आहे. त्यासाठी शहरासह जिल्ह्यातील खासगी व सहकारी कारखाने, अस्थापना, शासकीय कार्यालये यांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु, अनेक कारखाने व अस्थापना खासगी संस्थांचे सुरक्षा रक्षक नियुक्त करतात. त्यामुळे सुरक्षा रक्षक मंडळाकडे नोंद करूनही सुरक्षा रक्षकांना संधी मिळत नाही. सुरक्षा मंडळात नोंदणी केलेले १५८ सुरक्षा रक्षक कामाच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील पंधरा दिवसात कारखाने व अस्थापनांनी मंडळाकडे नोंदणी करावी, अन्यथा सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
.....