शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले; २६ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 17:08 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारी (दि.२०) शेतीसाठी उन्हाळी पहिले आवर्तन सोडण्यात आले. पहिल्या टप्प्यात ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. शनिवारी १५०० क्युसेकपर्यंत आवर्तन वाढविण्यात येणार आहे. दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून २६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. 

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारी (दि.२०) शेतीसाठी उन्हाळी पहिले आवर्तन सोडण्यात आले. पहिल्या टप्प्यात ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. शनिवारी १५०० क्युसेकपर्यंत आवर्तन वाढविण्यात येणार आहे. दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून २६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मुळा धरणातूनपाणी कधी सुटणार? यासंदर्भात शेतक-यांमध्ये उत्सुकता होती. अखेर शुक्रवारी पाणी सोडल्याने उजव्या कालवा लाभक्षेत्रातील उभ्या पिकांना जीवदान मिळणार आहे. मुळा धरणात सध्या २० हजार ११ दशलक्ष घनफूट इतका पाणी साठा आहे. येत्या ४० दिवसात सर्वसाधारण ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी वापरात येण्याची शक्यता आहे. मुळा धरणाचे कालवे दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. कालव्याला भराव टाकणे, गेट दुरूस्तीची कामे पूर्ण झालेली आहेत. या टप्प्यात उजव्या कालव्यातून ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यावर शेतकरी विद्युत मोटारी टाकून पाणी उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्युत मोटारी व पाईप ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या तयारीत पाटबंधारे खाते आहे. पाटबंधारे खात्याने रात्रंदिवस भरारी पथक तैनात केले आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या शेतीसाठी उन्हाळी आवर्तन २ हजार ५०० क्युसेकने सुरू आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले असले तरी गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता पाटबंधारे खात्याने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. शेतक-यांनी पाणी वाया जाऊ न देता काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी केले आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीDamधरणWaterपाणी