शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून पुन्हा उन्हाळी आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 11:34 IST

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून  मंगळवारी (दि.१२ मे) सकाळी सहा वाजता दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. २०० क्युसेकने पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे डाव्या कालव्याखालील अडीच हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

 राहुरी : मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून  मंगळवारी (दि.१२ मे) सकाळी सहा वाजता दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. २०० क्युसेकने पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे डाव्या कालव्याखालील अडीच हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मुळा धरणाचा डावा कालवा ८ मे रोजी बंद करण्यात आला होता. शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी मुळा डाव्या कालव्याखालील शेतकºयांनी मुळा पाटबंधारे खात्याकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी पुन्हा पाणी सोडण्यात आले आहे. आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे ऊस, कपाशी, चारा इत्यादी पिकांना दिलासा मिळणार आहे. मुळा डावा कालव्यातून पाणी सोडण्यासाठी शेतक-यांनी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार कार्यकारी अभियंता गणेश नाननोर, उपअभियंता योगेश जोर्वेकर, शाखा अभियंता विकास गायकवाड यांनी पाणी सोडण्याचे नियोजन केले. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या १२ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू आहे. फुटबॉल उघडा पडल्याने वांबोरी चारीचे पाणी मागच्या महिन्यातच बंद झाले आहे.वीस दिवस चालणार आवर्तन भागडा चारीचे आवर्तन सुरु असून त्याखाली असलेले पंचेचाळीस तलाव भरण्यात येणार आहेत. डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू झाल्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. मुळा डाव्या कालव्याचे आवर्तन वीस दिवस चालणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुळा पाटबंधारे खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणWaterपाणी