शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा आज शुभारंभ....!

By admin | Updated: June 2, 2016 23:07 IST

अहमदनगर : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षणाच्या अनेक वाटा विद्यार्थ्यांना खुणावत आहेत.

अहमदनगर : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षणाच्या अनेक वाटा विद्यार्थ्यांना खुणावत आहेत. परंतु त्यापैकी कोणती वाट निवडावी, करिअरसाठी कोणत्या शाखेची निवड करावी असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत. त्यांच्या याच प्रश्नांची उत्तरे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन प्रायोजित ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ मध्ये मिळतील. शिक्षणाचा महाकुंभ ठरणाऱ्या या प्रदर्शनाचा शुभारंभ शनिवारी होत आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन गायकवाड सांस्कृतिक भवन, प्रेमदान चौक येथे सकाळी ११ वाजता पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुजय विखे, महापौर अभिषेक कळमकर, आयुक्त दिलीप गावडे, पोलीस उपअधिक्षक बजरंग बनसोडे, न्यू इंडिया एश्योरन्स कं.चे प्रेमचंद मोरे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे सहाय्यक महाप्रबंधक प्रवीण करडे यांच्या हस्ते होत आहे.३ ते ५ जून पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन होणार आहे. बारावीनंतर कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपसूकच मिळतील. सर्व शैक्षणिक संस्थांची तसेच सर्व अभ्यासक्रमांविषयी सखोल माहिती पुरविणारे हे प्रदर्शन असेल. पालक असो वा पाल्य दोघांच्याही मनात करिअरविषयी असलेल्या सर्व समस्यांचे याद्वारे निरसन केले जाणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील.विविध महाविद्यालये, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, फॅशन, ग्राफिक्स, आयटीआय, अ‍ॅनिमेशन गेमिंग तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस स्पर्धा परीक्षा संबंधित संस्था या प्रदर्शनात सहभागी होणार आहे.केजेस एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पुणे, द न्यू इंडिया एश्योरन्स कं. लि. व स्टेट बँक आॅफ इंडिया, अहमदनगर शाखाचे प्रविण करडे, सहायक महाप्रबंधक हे या प्रदर्शनाचे असोसिएट स्पॉन्सर आहेत. तर रेडिओ सिटी हे रेडियो पार्टनर आणि निर्मल क्रिएशन हे आऊटडोअर पार्टनर आहेत. अधिक माहितसाठी ९७६७१२८००६ या क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त पालक तसेच विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.सेमिनार कॉमर्स क्षेत्रातील विविध संधी (उ.अ. & उ.र)आज दि. ३ जून २०१६. वेळ : सायं. ५ वा.मार्गदर्शक : संदीप देसरडा सर, देसरडा-भंडारी प्रोफेशनल अ‍ॅकॅडमी.सीईटी नंतरच्या प्रवेश प्रक्रियेपूर्वी महाराष्ट्रातील नामवंत महाविद्यालयांची माहिती मिळवा एकाच छताखाली.अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये सहभागी संस्थापद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरींग अहमदनगरअहमदनगर कॉलेज, अहमदनगर अ‍ॅमिटी ग्लोबल बिझनेस स्कूल, पुणे बँक आॅफ महाराष्ट्र देसरडा-भंडारी अ‍ॅकॅडमी, अहमदनगर डॉ. एन. जे. पाऊलबुधे इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक), नारायणडोह अहमदनगर इन्स्टिट्युट आॅफ कॉप्युटर अकाऊंट (आय.सी.ए.) केजेस् एज्युकेशनल इन्स्टिट्युट, पुणे मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई

न्यू आर्टस् कॉलेज, अहमदनगर

परिक्रमा एज्युकेशन कॅम्पस्, काष्टी

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे ४प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटी, लोणी

\राजाराम बापू कॉलेज शुगर टेक, इस्लामपूर

राजीव गांधी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक, कर्जुलेहर्या

साईदीप आॅटोमोबाईलस् प्रा. लि. अहमदनगर 

सह्याद्री व्हॅली कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी राजुरी, जुन्नर

संजीवनी एज्युकेशन सोसायटी, कोपरगाव

श्री छत्रपती ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट, नागपूर श्री छत्रपती शिवाजी इंजिनिअरींग कॉलेज, नेप्ती

सुमन रमेश तुलसियानी टेक्निकल कॅम्पस् (व्हिआयटी), पुणे

सुर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट, पुणेद न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि.

युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे ४विश्वभारती इंजिनिअरींग कॉलेज, अहमदनगर ४विवेकानंद कॉलेज आॅफ नर्सिंग, राहुरी.