शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्याच्या दरात मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:48 IST

तालुक्यात काही भागात मागील दोन तीन दिवसात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने सरासरी १४४.६६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

रोहित टेकेकोपरगाव : तालुक्यात काही भागात मागील दोन तीन दिवसात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने सरासरी १४४.६६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बियाण्यांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर चांगलीच गर्दी झाली आहे. परंतु सर्वच बियाणे खास करून मका बियाणाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ऐन दुष्काळात शेतक ऱ्यांच्याखिशाला चांगलाच आर्थिक फटका बसत आहे.कोपरगाव शहरात व तालुक्यात नोंदणीकृत १३५ कृषी सेवा केंद्र आहेत. त्यामध्ये सध्या भारतीय व बहुराष्ट्रीय ५० ते ६० कंपन्यांचे बियाणे उपलब्ध आहेत. मका व कपाशीमध्ये ५० ते ६० कंपन्यांचे प्रत्येकी ५ ते ६ वाण, सोयाबीनचे १५ ते १६ वाण, बाजरी १० वाण, तूर, मूग ३ ते ४ वाण उपलब्ध आहेत.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन, बाजरी, तूर, मूग यांच्या दरात प्रति पॅकेट ५० ते १०० रुपयाची तर मका बियाणाच्या प्रति पॅकेट मागे २०० ते ३०० रुपयाची वाढ झाली आहे. तर कपाशीच्या बियाणांवर शासनाने नियंत्रण आणल्याने भाव स्थिर आहेत. मात्र मका बियाणे विक्री करणा-या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बियाणे तसेच कीटकनाशके यांचेदर विक्रेत्यांना निश्चित करून दिलेल्या दराच्या खाली विक्रीकेल्यास विक्रीसाठी दिलेले बियाणे उचलून नेऊ, असेकाही दुकानदारांकडून सांगण्यात आले आहे.दुकानदारांना त्याच दरात विक्री करावी लागत असल्याने या कंपन्यांची एक प्रकारची मनमानीच म्हणावी लागेल .असे आहेत प्रति पॅकेटचे दरसोयाबीन ३० किलोच्या बॅगसाठी -१८०० ते १८५०मका ४ किलोच्या पॅकेटसाठी १२०० ते १८००बाजरी दीड किलोच्या पॅकेटसाठी ४५० ते ५३०तूर २ किलोच्या पॅकेटसाठी ३२० ते ३५०मूग १ किलोच्या पॅकेटसाठी १८० ते २२५तंत्र कपाशीचा प्रति ४५० ग्रॅम पॅकेट ७३० रुपये असे दर आहेत.शासनाने कपाशीप्रमाणेच खासगी कंपन्यांच्या मकासह इतर सर्वच बियाणांच्या दरावर नियंत्रण आणावे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही. शेतकºयांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळी पिके घ्यावी जेणेकरून उत्पादित मालाला चांगला भाव मिळेल. शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा . - आबासाहेब भोकरे, संचालक, अंकुर कृषी सेवा, कोपरगाव.बियाणे कंपन्यांनी त्यांचे दर निश्चित केले हा त्यांचा खासगी विषय आहे. परंतु निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दरात शेतकºयांना बियाणे विक्री केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - पंडित वाघेरे, कृषी अधिकारी, कोपरगाव.

 

यंदा बियाणे, खताचे, मजुरीचे भाव चांगलेच वाढले आहेत. मागील दोन वर्षापासून सततचा दुष्काळ आहे. सध्या पाऊस पडला आहे. परंतु शेती कशी उभी करायची हीच चिंता आहे. आमचे गाव दुष्काळग्रस्त जाहीर झालेले असताना शासनाकडून एका रुपयाचीही देखील अजून मदत मिळाली नाही. -संतोष सीताराम चव्हाण, शेतकरी,धोत्रे, ता.कोपरगाव. 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय