शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

देशनिर्माणासाठी श्रम आणि शिस्तीची गरज

By admin | Updated: June 17, 2014 00:37 IST

अहमदनगर : भारतात जनतेने लोकसभा निवडणुकीतून मोठे राजकीय परिवर्तन घडविले आहे. कोणीही एक व्यक्ती, एक पक्ष किंवा आघाडी जटील प्रश्न सोडवेल

अहमदनगर : भारतात जनतेने लोकसभा निवडणुकीतून मोठे राजकीय परिवर्तन घडविले आहे. कोणीही एक व्यक्ती, एक पक्ष किंवा आघाडी जटील प्रश्न सोडवेल, असे समजून निष्क्रिय होणे जनतेला परवडणारे नाही. त्यामुळे सामुदायिक श्रम, शिस्तीचा अवलंब करूनच भारताला महासत्ता बनवावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांचा स्नेहालयातर्फे हिंमतग्राम येथील प्रकल्पात रविवारी ७६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ‘भारतनिर्माणाच्या नव्या प्रेरणा’ या विषयावर हजारे बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अनिल कवडे, सुमन त्रिभुवन, बाबुशेठ भंडारी, मिलिंद कुलकर्णी, संतोष होनकरपे आदी उपस्थित होते.हजारे म्हणाले, देशातील तरुणाईने मागील तीन वर्षांपासून भ्रष्टाचार, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि राजकीय अराजकांविरुद्ध संघटित आंदोलन केले. यावेळी युवकांना संघटित करण्यात सामाजिक माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. देशातील नव्या राज्यकर्त्यांकडून युवकांना खूप अपेक्षा आहेत. त्यांची अपेक्षापूर्ती शासनकर्त्याकडून झाली नाही तर संघटित युवा शक्ती कोणालाही माफ करणार नाही. तथापि कोणीही मसिहा आपले प्रश्न सोडवेल, असे म्हणणे आत्मघात ठरेल. जनमताचा संघटित आणि सक्रिय दबाव कायम राहिला पाहिजे. तरच राजकीय व्यवस्था आणि राज्यकर्ते जबाबदारीने काम करतात.हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहालयातर्फे एक हजार वृक्षांचे रोपण, दोनशे जणांचे रक्तदान, ग्रामसफाई आदी कार्यक्रम झाले.अण्णांसोबत भ्रष्टाचारविरोधी लढ्यात कार्यरत असलेल्या जळगाव येथील नरेंद्र अण्णा पाटील आणि अमरावती येथील अविनाश जुनघरे यांचा अण्णांनी भारतसेवक पुरस्काराने सन्मान केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला ऋषिकेश पत्की,डॉ. संदीप साठे,डॉ. गणेश पोटे, रोहित जोशी, योगेश उंडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीत बारावी उत्तीर्ण झालेल्या १२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त झालेल्या श्रमसंस्कार शिबिरात ५५ युवकांनी सहभाग घेतला. पुणे येथील रोटरी क्लब आॅफ प्राईमसिटी यांनी एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी ३ लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका स्नेहालयाला भेट दिली.