शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोपरगाव आठवडे बाजाराचे ओटे आठ महिन्यापासून धूळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 16:07 IST

कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बाजारतळ परिसरात ३२ गुंठे जागेत सुमारे १ कोटी ८९ लाख रुपये खर्चून आठ महिन्यापूर्वी बाजारओटे बांधले. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव देऊन बांधण्यात आलेले आठवडे बाजार ओटे धूळखात पडून आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

रोहित टेके । कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेने सोमवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी बसण्याकरिता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बाजारतळ परिसरात ३२ गुंठे जागेत सुमारे १ कोटी ८९ लाख रुपये खर्चून आठ महिन्यापूर्वी बाजारओटे बांधले. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव देऊन बांधण्यात आलेले आठवडे बाजार ओटे धूळखात पडून आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.कोपरगाव नगरपरिषदेने भाजीपाला विक्री करणा-या शेतकरी, व्यापारी यांच्या दृष्टीने डिसेंबर २०१७ मध्ये काम सुरु करून जून २०१९ मध्ये २२०० चौरस फुटाचे काम पूर्ण केले. त्यात १५ आठवडे बाजार ओट्यांच्या शेडची निर्मिती केली. या ओट्यांची अंदाजे ३३४ इतकी संख्या आहे. उर्वरित  मोकळ्या जागेतही १५० असे एकूण ५०० च्या वर विक्रेते या ठिकाणी बसू शकतात.कोपरगाव शहरातील आठवडे बाजारात १२०० च्या आसपास शेतकरी तसेच इतर व्यापारी आपला माल विक्रीसाठी घेऊन येत असतात. त्यापैकी आर्धी संख्या ही शेतमाल विक्री करणा-यांची आहे. परंतु शेतमाल विक्री करणा-यांना जुन्या जागेवर बाजार भरला जातो तेथे जागा मिळत नाही. पर्यायाने हे सर्व विक्रेते शहरातील मुख्यरस्ता तसेच उपरस्त्यावर आपला शेतमाल घेऊन बसतात. त्यामुळे दर सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मात्र याकडे नगरपरिषद प्रशासन गंभीरतेणे बघत नसल्याने याचा हकनाक त्रास शहरात येणा-या प्रवाशांना सहन करावा लागतो.नागरिकांचा त्रास कमी होणार का ? शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळवून आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करणा-यासाठी बांधलेली आठवडे बाजार ओटे गेल्या आठ महिन्यापासून धूळखात पडून आहे. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रासही सहन करावा लागत आहे. मात्र ही कोंडी कमी करण्यासाठी पालिकाप्रशासन काय भूमिका घेते याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

 भाजीपाला विक्रेत्यांना लवकरच नवीन बांधण्यात आलेल्या जागेत स्थलांतरित करण्यात येईल. त्यातून वाहतूक कोंडीचे देखील प्रमाण कमी होईल, असे कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावBaazaarबाजार