शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात भाजीपाला विक्रेत्यांचा नगराध्यक्षांच्या घरासमोर ठिय्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:18 IST

प्रशासनाने ठरवून दिलेले नियम व अटी या मान्य नसल्याने कोपरगाव शहरातील भाजीपाल्याचा आठवडेबाजार करणारे शेकडो शेतकरी व व्यापा-यांनी रविवारी सकाळी ९ वाजता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. 

कोपरगाव : प्रशासनाने ठरवून दिलेले नियम व अटी या मान्य नसल्याने कोपरगाव शहरातील भाजीपाल्याचा आठवडेबाजार करणारे शेकडो शेतकरी व व्यापा-यांनी रविवारी सकाळी ९ वाजता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले.        जमाव बंदीचे आदेश असताना या ठिकाणी शेकडोच्या संखेत मोठा जमाव झाला होता. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी यात हस्तक्षेप करून त्यांची समजूत काढून त्यांना वहाडणे यांच्या घरासमोरून काढून दिले. कोपरगावात प्रशासनाने शहरातील फक्त आठवडेबाजार करणाºया शेतकरी व विक्रेत्यांना मंगळवार व शुक्रवार या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत बाजारतळ येथील आठवडे बाजारातील ओट्यांवर बसण्याचे आदेश नागरपरिषद व प्रशासनाने दिला आहे. हा आदेश भाजीविक्रेते, व्यापा-यांना मान्य नसल्याने त्यांनी रविवारी सकाळी शहरातील धारणगाव रस्त्याच्याकडेला बाजार भरविण्यास सुरुवात केली. मात्र नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाने त्यांना रस्त्याच्याकडेला बसण्यास तुम्हाला परवानगी नाही. रस्त्यावर गर्दी होऊन फिजिकल डिस्टसिंग पाळले जाणार नाही. असे सांगत त्या ठिकाणाहून दुकाने काढण्यास सांगितले. मात्र आठवडे बाजार करणारे भाजीपाला विक्रेत्यांनी त्यास हरकत घेऊन आम्हाला ज्या दिवशी भाजीपाल्याचा लिलाव होतो. त्यादिवशी विक्री करण्याची परवानगी द्यावी. नेहरू भाजी मार्केटमध्ये जर तुम्ही काही भाजीपाला विक्रेत्यांना रोज बसण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शहराच्या एका बाजूला असलेल्या बाजार ओट्याकडे नागरिक भाजीपाला खरेदीसाठी येणार नाही. तुम्ही एक तर सर्वांना तिकडे बसवा किंवा आम्हाला तहसील मैदान येथे बसण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बाजार ओट्यावरच विक्री करा     मात्र प्रशासनाने आपल्या भूमिकेवर ठाम राहत त्यांचा भाजीपाला माल जप्त करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बाजार करणारे भाजीपाला विक्रेते यांनी नगराध्यक्ष यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. मात्र नगराध्यक्ष बाहेरगावी गेले असल्याने त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने येऊन भाजीपाला विक्रेते, व्यापारी यांची समजूत काढत बाजारतळ येथील बाजार ओट्यावरच तुम्हाला बसावे लागेल. भाजीपाल्याचा ज्या दिवशी लिलाव होईल ते दोन दिवस तुम्हाला ठरवून देण्यात येतील. असे सांगत जप्त केलेला भाजीपाल्याचा माल पोलीस निरीक्षक माणगावकर यांनी परत देण्याच्या सूचना केल्या. बाजारतळ येथील बाजार ओट्यांवर त्यांना भाजीपाला विक्री करण्यास सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावMarket Yardमार्केट यार्डShoppingखरेदी