शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी बलात्कार प्रकरण- दोषी कोर्टात म्हणाले आम्ही निर्दोष, शिक्षेबाबत उद्या निर्णयाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 12:49 IST

कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील दोषींच्या शिक्षेवर मंगळवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. दरम्यान या प्रकरणातील जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे या दोघांनीही आम्ही निर्दोष असल्याचे न्यायालयात सांगितले.

ठळक मुद्दे कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील दोषींच्या शिक्षेवर मंगळवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे या दोघांनीही आम्ही निर्दोष असल्याचे न्यायालयात सांगितले.

अहमदनगर : कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील दोषींच्या शिक्षेवर मंगळवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. दरम्यान या प्रकरणातील दोषी जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे या दोघांनीही आम्ही निर्दोष असल्याचे न्यायालयात सांगितले.तिन्ही दोषींच्या शिक्षेबाबत उद्या सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाच्या वतीने उद्या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर दोषींच्या शिक्षेबाबत न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र शिंदे याच्यातर्फे अ‍ॅड. योहान मकासरे यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, आरोपीला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो सराईत गुन्हेगार नाही. त्याच्या घरी आई, पत्नी आहे. त्याची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. त्याला फाशी न देता जन्मठेप द्यावी.

नितीन भैलुमे याच्यातर्फे अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, भैलुमेविरोधात कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला नाही. सर्व परिस्थीतीजन्य पुरावे आहेत़ आरोपी सराईत गुन्हेगार नाही. त्याच्यावर एकही गुन्हा नाही. तो कॉलेजचा विद्यार्थी आहे़ त्याचे वय अवघे २६ वर्ष आहे. त्याच्या घरात आई, वडील आहेत. आईचे आॅपरेशन झालेले आहे. वडील बाहेर गेल्यानंतर आईची काळजी घ्यायला कोणीही नाही. हे गरीब कुटूंब आहे. या घटनेमुळे त्याचे आयुष्य उद्धवस्त झालेले आहे. त्याच्या भविष्याचा विचार करुन त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी.दोघा वकिलांचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे यांना त्यांच्यावरील गुन्ह्याबाबत विचारले असता त्या दोघांनीही निर्दोष असल्याचे सांगितले. तर जितेंद्र शिंदे याला शिक्षेबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘शिक्षा एक दिवसाची काय किंवा हजार दिवसाची काय?’ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरkopardi caseकोपर्डी खटलाCourtन्यायालय