शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 10:51 IST

कोपर्डी खटल्यातील दोषी क्रमांक तीन नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अाहेर यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली अाहे. अाहेर यांनी दोषींना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती.

संगमनेर(अहमदनगर) - कोपर्डी खटल्यातील दोषी क्रमांक तीन नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अाहेर यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली अाहे. अाहेर यांनी दोषींना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. यावर ''बुधवारी न्यायालयात दोषीला फाशीच द्या असे सांगा, अन्यथा जीवे मारू'' अशी धमकी प्रकाश आहेर यांनी देण्यात आली अाहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात अाहेर यांनी तक्रार दाखल केली अाहे. ही धमकी फोनवरुन मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची आज सुनावली जाणार आहे. शिक्षेच्या सुनावणीनिमित्त अहमदनगर कोर्टाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या खटल्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप की फाशी हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान,  सुनावणीवेळी कोर्ट परिसरात मोठी गर्दी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.  

कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी नको, जन्मठेप द्या, दोषींच्या वकिलांची विनंतीकोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या खटल्यात मंगळवारी दोन दोषींच्या वकिलांनी शिक्षेवर युक्तिवाद केला. जितेंद्र शिंदेच्या वकिलाने फाशीऐवजी जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली. तर नितीन भैलुमे याच्या वकिलाने कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली. बुधवारी संतोष भवाळचे वकील व सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. उज्ज्वल निकम शिक्षेबाबत युक्तिवाद करतील.शिंदे याच्या वतीने योहान मकासरे, तर भैलुमे याच्या वतीने प्रकाश आहेर यांनी युक्तिवाद केला. मकासरे म्हणाले, शिंदे याला पत्नी व आई-वडील आहेत.त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे़ ही बाब विचारात घेऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी.

न्यायालयाने जितेंद्र शिंदे यास शिक्षेबाबत काही बोलायचे आहे का, अशी विचारणा केली. त्यावर, आपण त्या मुलीला मारलेच नाही, दुसरेच कुणीतरी मारले आहे. शिक्षा एक दिवस काय आणि हजार दिवसांची काय, असे उत्तर त्याने दिले.मी निर्दोष आहे - भैलुमेनितीन भैलुमे याला समोर बोलावून शिक्षेबाबत न्यायालयाने विचारले, तेव्हा त्याने ‘मी निर्दोष आहे’ एवढेच सांगितले. त्याच्या डोळ्यात पाणी आले होते.

काय आहे नेमकं प्रकरण?अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. जलदगती न्यायालयात सुनावणी करुन आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.

टॅग्स :kopardi caseकोपर्डी खटलाadvocateवकिल