शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

नगर जिल्ह्यातील कारागृह बनलेत कोंडवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 15:42 IST

कर्जत येथील उपकारागृहाचे छत्र कापून तीन दिवसांपूर्वी पाच आरोपी फरार झाले. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील उपकारागृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील सर्वच उपकारागृहांची दयनीय अवस्था आहे. 

अरुण वाघमोडे । अहमदनगर : कर्जत येथील उपकारागृहाचे छत्र कापून तीन दिवसांपूर्वी पाच आरोपी फरार झाले. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील उपकारागृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील सर्वच उपकारागृहांची दयनीय अवस्था आहे. उखनलेल्या भिंती, मोडकळीस आलेल्या खिडक्या आणि तुटलेले कौलारु अशा अवस्थेत उभ्या असलेल्या या कारागृहात आरोपी कसे कैद राहणार? असा प्रश्न आहे. नगर शहरात एक जिल्हा कारागृह तर तालुकास्तरावर बारा उपकारागृह आहेत. बहुतांशी उपकारागृहांच्या इमारती या इंग्रजांच्या काळातील आहेत. त्यामुळे या ठिकाणी कैदी ठेवणे योग्य नाही़ नगर येथील कारागृहाची क्षमता ६३ कैद्यांची आहे़. या कारागृहात मात्र नेहमीच तीन ते चार पट जास्त कैदी ठेवले जातात. सध्या या ठिकाणी १६८ कैदी आहेत. येथे जागा उपलब्ध होत नसल्याने गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तालुकास्तरावरील जुनाट झालेल्या कारागृहात ठेवले जात आहे. आरोपी येथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. वर्षभरापूर्वी  कोपरगाव येथील उपकारागृहातील सतरा कैद्यांनी बराकीत सुरंग खोदून पळून जाण्याचा प्रयत्न केल होता. जिल्हा कारागृह तुरुंग प्रशासनाच्या अंतर्गत येते तर इतर बारा उपरागृह हे महसूल प्रशासनाच्या अंतर्गत येतात. या इमारतींची डागडुजीची जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे तर येथील सुरक्षेची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे. राज्यात नगर जिल्ह्यात सर्वाधिक बारा उपकारागृह आहेत. जिल्ह्यातील पारनेर, कर्जत, नेवासे, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव, जामखेड, राहुरी, श्रीरामपूर, श्रीगोंदे, अकोले, संगमनेर येथे असलेल्या या दुय्यम कारागृहांची क्षमता ४० ते ५० कैदी ठेवण्याची आहे. प्रत्यक्षात मात्र येथे क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवले जातात. नवीन कारागृहाचा प्रस्तावच अजून गेला नाही नगर तालुक्यातील नारायणडोह येथील ११ एकर जागेवर ५०० कैद्यांची क्षमता असलेले नवीन वर्ग १ चे कारागृह प्रस्तावित आहे. या कारागृहाचा नकाशा आणि आराखडा तयार करण्याचे काम येथील बांधकाम विभागाकडे गेल. अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे नवीन कारागृहासाठी अजून शासनाकडे प्रस्तावच पाठविण्यात आलेला नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

 कर्जत येथील कोठडीतून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील इतर उपकारागृहांच्या सुरक्षेबाबत आढावा घेण्याचे आदेश महसूल प्रशासनाला जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. पोलीस प्रशासनाच्या दृष्टिनेही येणा-या काळात योग्य ती दक्षता घेतली जाईल, असे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील यांनी सांगितले.      

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतCrime Newsगुन्हेगारी